'ब्राउन' मालिकेतील करिश्मा

ओटीटीच्या जगतात अनेक कलाकार नव्या आणि आव्हानात्मक भूमिकांसोबत परतत आहेत. आता अभिनेत्री करिश्मा कपूर एक अत्यंत नव्या आणि पूर्वीपेक्षा वेगळ्या शैलीत दिसून येणार आहे. करिश्माची आगामी वेबसीरिज ‘ब्राउन’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. झी5च्या या नव्या सीरिजमध्ये करिश्मा ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ही कहाणी केवळ साधारण गुन्हे तपासावर आधारित नाही, तर यात अनेक मनोवैज्ञानिक आणि भावनात्मक पदर जोडलेले आहेत. सीरिजची कहाणी कोलकाता शहराची असून करिश्मा यात ‘रीटा ब्राउन’ नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. एक बदनाम पोलीस अधिकारी आणि तिच्या ज्युनियर महिलांना लक्ष्य करणाऱ्या एक सीरियल किलरचा शोध घेतला जात आहे. पोलीस अधिकारी स्वत:च्या भयानक भूतकाळ अन् गिल्टला तोंड देत आहे. कहाणी थ्रिलने भरलेली असून प्रेक्षकांना वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळवून देणारी आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन अभिनय देव यांनी केले आहे. त्यांनी कहाणीला नियो-नोयर सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलरच्या स्वरुपात तयार केले आहे. सीरिजमध्ये गुन्ह्याच्या तपासासोबत मुख्य व्यक्तिरेखेचे आयुष्य आणि मानसिक संघर्ष देखील कहाणीचा महत्त्वाचा हिस्सा असणार आहे.

Comments are closed.