वीणा विजयन यांच्या अडचणी वाढल्या

ईडी तपासाला स्थगिती देण्यास नकार

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

एक्सालॉजिक सोल्युशन्स आणि त्याच्या अध्यक्ष वीणा विजयन यांना मोठा झटा बसला आहे. केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी वादग्रस्त सीएमआरएल-एक्सालॉजिक वित्तीय देवाणघेवाण प्रकरणी ईडीच्या चौकशीवर तत्काळ स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे केंद्रीय यंत्रणेला स्वत:ची चौकशी जारी ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील आठवड्यात ईडीने माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या निवासस्थानासमवेत 10 ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर सीएमआरएलने दिलासा मिळावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. केरळमध्ये अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान हा घोटाळा मुख्य मुद्दा ठरला होता.

प्रारंभिक टप्प्यात चौकशी रोखण्यास नकार देत उच्च न्यायालयाने ईडीला पीएमएलए अंतर्गत कार्यकाही करण्यास मुभा दिली आहे. कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेडने (सीएमआरएल) स्वत:च्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत पुढील चौकशीच्या कारवाईच्या विरोधात अंतरिम सुरक्षेची मागणी केली होती. चौकशी रोखणे योग्य नसल्याचे संकेत देत न्यायालयाने ईडीला स्वत:ची चौकशी जारी ठेवण्याची अनुमती दिली.

ईडीने स्वत:च्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर जात कंपनीच्या विरोधात कुठलाही एफआयआर नोंद होण्यापूर्वीच कार्यवाही केली होती. एफएसआयओची चौकशी एका राजकीय नेत्याकडून दाखल तक्रारीच्या आधारावर सुरू करण्यात आली होती असा युक्तिवाद सीएमआरएलने सुनावणीदरम्यान केला. परंतु उच्च न्यायालयाने चौकशी पूर्ण करण्याची अनुमती का दिली जाऊ नये असा प्रश्न उपस्थित केला.

आक्षेप?

चौकशीच्या अखेरीस कुठलाही घोटाळा न आढळल्यास कंपनीला क्लीनचिट मिळेल. कंपनी एक्सालॉजिकसोबत स्वत:च्या देवाणघेवाणीशी संबंधित दस्तऐवज सादर करण्यास आक्षेप का घेत आहे असा सवालही न्यायालयाने केला आहे.

Comments are closed.