माझ्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप
बीड: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंवरती (Dhananjay Munde) करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्या बहिणीसोबत गैरकृत्य झाले. त्याची तक्रार माझी आई पोलीस ठाण्यात करणार होती. मात्र तिच्यावर मोठा दबाव होता. त्यामुळे तिने आत्महत्या केली. माझ्या आईची सुसाईड नोट माझ्याकडे असून ती मी न्यायालयात सादर केली आहे. माझे सर्व पुरावे या लोकांनी घरातून गायब केले. परळी पोलीस ठाण्यात जमा असलेल्या हार्ड डिस्कमध्ये काहीही नाही. माझ्या हाती केवळ डबा देण्यात आला. 2005 मध्ये राजश्री मुंडे आणि मी प्रेग्नेंट होती आणि त्यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी माझ्या बहिणी सोबत गैरकृत्य केले, असा खळबळजनक आरोप करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी केले आहेत.
Karuna Munde: त्याच्या डोक्यावर परिणाम झाला तर काय करायचं
समाजाने केलेल्या मतदानाचा जे गैरवापर करत आहेत त्यांना थांबवण्यासाठी मी हे करत आहे. ते जातीपातीचा मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरतात. आमच्या दोघा नवरा बायकोचे भांडण होते. मात्र त्यांनी निवडणुकीतील माझा उमेदवारी अर्ज बाद केला. मनोज जरांगे पाटील यांची भेट देऊन मी न्याय देण्याची मागणी केली. मात्र धनंजय मुंडे यांना खेटण्यासाठी मी सक्षम असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी मला चांगला सल्ला दिला. आज माझ्या मुलामुलींना न्याय मिळत नाही. त्यांचे खच्चीकरण सुरू आहे. माझा हिऱ्यासारखा मुलगा त्याच्या हाताला काम नाही. तो तीन वर्षांपासून घरात आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला तर काय करायचं. मला लोकांमध्ये फिरण्याची आवड नाही. मात्र त्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे, म्हणून मी लढत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Karuna Munde: माझ्या बहिणीने तिच्यासोबत जे जे घडलं ते घरामध्ये सांगितलं
करुणा मुंडे यांच्या आईने आत्महत्या केली होती त्याबाबत आता त्यांनी खळबळजनक आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती केले आहेत. एबीपी माझाशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, माझ्या बहिणीने तिच्यासोबत जे जे घडलं ते घरामध्ये सांगितलं होतं. तेव्हा माझी मुलं छोटी छोटी होती आणि मला त्या घटनेची काही माहिती देखील नव्हती. त्या घटनेत माझा नवरा दोषी आहे की माझी बहीण दोषी आहे, हे मला माहिती नव्हतं. आपण एखाद्या व्यक्तीवर बोलू शकत नाही. एकीकडे माझी बहीण होती आणि दुसरीकडे माझा नवरा होता.
Karuna Munde:राजश्री मुंडे आणि मी दोघी एकाच वेळी प्रेग्नेंट
माझी आई याप्रकरणी पोलिसात जाणार होती. तक्रार करण्यासाठी, सखोल चौकशी करण्यासाठी ती पोलिसात जाणार होती याप्रकरणी तिच्यावरती मोठा दबाव आणला गेला, त्यामध्ये तिने आत्महत्या केली. आईची सुसाईड नोट आहे. त्याप्रकरणी कोर्टामध्ये केस सुरू होती. घरगुती हिंसाच्या प्रकरणात मी सर्व गोष्टी लिहून दिलेले आहेत. आता जी के सुरू आहे ती सर्व पुराव्यांवर आहे या सर्व लोकांनी माझे घरामधून पुरावे देखील उचलून नेले होते. माझं आयपॅड आणि ड्राईव्ह मला मिळालेले आहेत, वरळी पोलीस स्टेशनमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी काहीही ठेवलेलं नाही. फक्त डब्बा माझ्या हातात दिलेला आहे. त्यामध्ये काहीच नाही. राजश्री मुंडे आणि मी दोघी एकाच वेळी प्रेग्नेंट होते 2005 मध्ये आम्ही दोघी प्रेग्नेंट असताना त्यांनी माझ्या बहिणीसोबत चुकीचं केलं ज्यावेळी मी इंदौरला गेले होते, डिलिव्हरीसाठी त्यावेळी त्यांनी हे केलं असंही करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.