ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : करुणा शर्मा
संतोष देशमुख प्रकरणातील करुणा शर्मा: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची (Santosh Deshmukh Murder Case) क्रौर्याची परिसिमा गाठणारे फोटो समोर आले आहेत. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त करण्यात आलेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसून येत आहे. संतोष देशमुख यांच्या अंगावरील कपडे काढून, त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती.देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून त्यांच्या चेहऱ्यावर आरोपींनी लघवी केली. हत्येचा घटनाक्रम समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आता यावर करुणा शर्मा (karuna Sharma) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
करुणा शर्मा म्हणाल्या की, आज महाराष्ट्राला न्याय मिळेल. मी एक फोटो बघितला की, संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्यावर तोंडावर लघवी करत आहे. या लोकांची काय मानसिक स्थिती आहे? हसत हसत संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे फोटो, व्हिडिओ काढत आहेत. वाल्मिक कराड तो व्हिडिओ लाईव्ह बघत आहे. आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे? त्यांनी जी लघवी केलेली आहे ती संतोष देशमुख यांच्या तोंडावर नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनावर लघवी केलेली आहे. एका मृत व्यक्तीची अशी अवस्था हे लोक करू शकतात तर एका जिवंत व्यक्तीची हे लोक काय अवस्था करतील.
त्यांच्या तोंडावरही तेच करा
धनंजय मुंडे यांनी मागणी केली होती, वाल्मीक कराडने स्वतः सरेंडर झाल्यानंतर मागणी केली होती की, जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आता आमची नाही तर त्यांचीच मागणी पूर्ण करा. त्यांची मागणी होती की फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आता संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की, या लोकांना फाशीची शिक्षा द्या. माझी स्वतःची मागणी आहे की, ज्यांनी संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली, त्यांना जनतेसमोर आणा, त्यांच्या तोंडावरही तेच करा. अजित पवार अजुनही गप्प का? अजितदादा सुरूवातीपासून धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आलेत. या प्रकरणातून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झालीय. मी 27 वर्ष त्यांच्या घरात राहिलीय, मंत्री कसा वागतो?, हे मी जवळून पाहिले आहे, असा हल्लाबोल करुणा शर्मा यांनी केला.
मस्तकात आग आणि डोळ्यात पाणी होतं : रोहित पवार
तर या प्रकारावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, काल जेव्हा फोटो आले तेव्हा महाराष्ट्र हादरला. मस्तकात आग आणि डोळ्यात पाणी होतं. महाराष्ट्र स्तब्ध झाला, छातीवर पाय ठेऊन फोटो काढण्यात आले. कायदा सुव्यवस्थेवर लघवी केली. हे फोटो आधीच सीएम आणि दादांकडे आले असतील. हे फोटो पाहून तुम्हाला मन आहे का? असा प्रश्न पडला. तुमची मैत्री कचऱ्यात टाका, कराड राक्षसी प्रवृत्तीचा माणूस आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
https://www.youtube.com/watch?v=h9g8rgnzwo4
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.