‘माझ्या मुलाला न्याय द्या’, केतन अग्रवालच्या आईची पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी आर्त हाक, ई-मेल

केतन अग्रवाल प्रकरण: पुण्यातील (Pune) तरुण व्यावसायिक केतन अग्रवालच्या  (Ketan Agrawal) हत्येनंतर त्याच्या आईने न्यायासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडे धाव घेतली आहे. केतनची आई राखी अग्रवाल (Rakhi Agrawal) यांनी पंतप्रधानांना एक अत्यंत भावनिक ई-मेल (Email) पाठवत आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या ई-मेलमध्ये त्यांनी मुलाच्या निधनानंतर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचे दु:ख, आजोबांच्या मृत्यूचा धक्का आणि न्यायाची आर्त हाक शब्दबद्ध केली आहे.

राखी अग्रवाल यांनी आपल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, आयुष्यात कधीही आपल्या मुलासाठी न्याय मागण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहावे लागेल, असा विचारही त्यांनी केला नव्हता. प्रत्येक आईचे स्वप्न असते की, आपल्या मुलाचे लग्न व्हावे, त्याने संसार थाटावा आणि आनंदाने आयुष्य जगावे. मात्र, त्यांना स्वतःच्या मुलाचा अंत्यसंस्कार करावा लागला, ही वेदना आयुष्यभर विसरणे अशक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

Ketan Agrawal Case: ‘केतनच्या आठवणी प्रत्येक क्षणी अस्वस्थ करतात’

ई-मेलमध्ये त्यांनी सांगितले की, केतनच्या हत्येनंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. घरातील प्रत्येक कोपरा, त्याची खोली, कपडे आणि छायाचित्रे त्याच्या आठवणींनी भरलेली आहेत. प्रत्येक दिवस मुलाच्या आठवणीत जात असून, त्या वेदनेतून कुटुंब अद्याप सावरू शकलेले नाही.

केतन अग्रवाल प्रकरण: 'काही दिवसात दोन पिढ्या गेल्या'

राखी अग्रवाल यांनी आपल्या ई-मेलमध्ये आणखी एक हृदयद्रावक बाब मांडली आहे. केतनच्या मृत्यूचा धक्का त्याच्या आजोबांना सहन झाला नाही आणि काही दिवसांतच त्यांचेही निधन झाले. त्यामुळे अल्पावधीतच कुटुंबाने दोन पिढ्या गमावल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी लिहिले की, “आमच्या कुटुंबाने काही दिवसांत दोन पिढ्या गमावल्या आहेत.”

Ketan Agrawal Case: ‘सहानुभूती नको, फक्त न्याय हवा’

पंतप्रधानांकडे कोणत्याही विशेष कृपेची किंवा सहानुभूतीची मागणी न करता, राखी अग्रवाल यांनी फक्त निष्पक्ष आणि जलद तपासाची मागणी केली आहे. “केतन कोणाचा तरी मुलगा, भाऊ आणि नातू होता, पण आमच्यासाठी तो आमचे संपूर्ण जग होता. हा खटला केवळ पोलिसांच्या दप्तरी एक फाईल बनून राहू नये. दररोज रात्री मी केतनच्या फोटोकडे पाहून एकच प्रार्थना करते की, एक दिवस मी त्याला सांगू शकेन- बेटा, तुला न्याय मिळाला!” अशा भावूक शब्दांत त्यांनी दोषींना कायद्यानुसार कठोर आणि फाशीसारखी कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Ketan Agrawal Case: तपास आणि खटल्यात विलंब होऊ नये

राखी अग्रवाल यांनी पंतप्रधानांना विनंती केली आहे की, या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन सुनावणीत कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये. दोषींना शक्य तितक्या लवकर कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. एका दु:खी आईचा आवाज देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलीय.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर ‘या’ चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली

Comments are closed.