लग्नापूर्वीच सिया गोयलला सासूची वॉर्निंग, तुला एकाही पार्टीला पाठवणार नाही, आमच्या घरात ड्रिकिं
पुणे गुन्हे सिया गोयला: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची 18 जून रोजी लोहगडावरील (Lohagad Fort) दरीत ढकलून देऊन हत्या करण्यात आली. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत कट रचून केतनची हत्या (Murder news) केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही घटना उघड झाल्यानंतर पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली. या सगळ्या घटनेनंतर केतन अग्रवालच्या (Ketan Agarwal) आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज माझा मुलगा गेला आहे. त्याला सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर जबाबदार आहेत. प्रियाची आई पूजा गोयल आणि तिचा भाऊ आणि आत्या हेदेखील तितकेच दोषी आहेत. या सगळ्यांना फाशी व्हावी, अशी मागणी केतन अग्रवालच्या आईने केली. (Ketan Agrawal Murder at Lohagad Fort)
मी पूजाला सून मानलं होतं. ती आमच्या घरीही आली होती. एकदा पूजेला, नंतर वाढदिवसाला आणि एकदा डिनरला सिया आमच्या घरी आली होती. त्यावेळीच मी सियाला सांगितले होते की, आमच्या घरी ड्रिंक घेतलेले (मद्यसेवन) चालत नाही. मी तुला लग्नानंतर कोणत्याही पार्टीलाही पाठवणार नाही. पण तिच्या आई-वडिलांनी सिया ड्रिंक करते, हे आमच्यापासून लपवून ठेवले.
तिची आई पूजा गोयल ही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे. 18 जूनलाही पूजा गोयल हिचा फोन आला होता. ती मला विचारत होती की, तुम्ही केतनला सियासोबत फिरायला का पाठवता? मी त्यांना सांगितले की, सिया हिच माझ्या मुलाला खेचून घेऊन गेली आहे. आमचं 20 जणांचं एकत्र कुटुंब आहे. आमच्या घरी सिया आली तेव्हा कोणालाही तिच्या डोक्यात वेगळेच काहीतरी सुरु असेल, याचा जराही अंदाज आला नाही. सिया आणि मी अनेकदा शॉपिंगला एकत्र गेलो आहोत. ती व्हिडीओ कॉलवरही माझ्याशी बोलायची. तेव्हा ती अत्यंत साधेपणाने आणि हसतखेळत बोलायची, असे केतन अग्रवाल याच्या आईने सांगितले.
#पाहा | पुणे, महाराष्ट्र | केतन विशाल अग्रवालच्या मृत्यूबद्दल, त्याची आई म्हणते, “माझा मुलगा आता राहिला नाही. याला सर्वस्वी सिया आणि तिचा प्रियकर जबाबदार आहेत. तिने (सिया) माझा विश्वासघात केला आणि खोटे बोलले… यात काही संशयास्पद नव्हते; आम्हाला एकही शंका नव्हती. मी तिला अनेकदा भेटलो, आणि… pic.twitter.com/HurVu9GSNn
— ANI (@ANI) 23 जून 2026
आणखी वाचा
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.