‘त्या’ हुडी, मास्क अन् गॉगलमुळेच तो खेळ आला उघडकीस; तपास अधिकारी दिनेश तायडेंनी सांगितला सिया-च
लोणावळा/पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याच्या खळबळजनक हत्याकांडात आता पोलिसांच्या एफआयआर (FIR) कॉपीमधून आणि थेट लोहगड किल्ल्यावरील घटनास्थळावरून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला ‘वाढदिवसाचे सेलिब्रेशन आणि सेल्फी’ घेताना झालेला अपघात असल्याचा बनाव मुख्य आरोपी आणि भावी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) हिने रचला होता. या प्रकरणी पोलिसांना तपासावेळी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी आपला गुन्हा कबूल केला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी दिनेश तायडे यांनी ‘एबीपी’ बोलताना या प्रकरणाचा सविस्तर तपशील सांगितला आहे. आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांनाही लोणावळा पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलं आहे.
Ketan Agrawal Death : इतक्या कडक उन्हात टोपी, मास्क गॉगल आणि हुडी…
एबीपीच्या प्रश्नांवरून आरोपींची पळ काढण्याची धडपड दिसून आली. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी असे का केले, असा प्रश्न जेव्हा एबीपी न्यूजने त्यांना विचारला, तेव्हा आरोपींनी काहीही न बोलता मौन बाळगले. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतक्या कडक उन्हाच्या दरम्यानही चेतन चौधरीने हुडी घातली होती, इतक्या कडक उन्हात टोपी, मास्क गॉगल आणि हुडी घालून तो त्याची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होता.ते सीसीटीव्हीत दिसलं त्यानंतर आमचा संशय बळावला, त्यानंतर आम्ही त्याच्या येण्याजाण्याची वेळ आणि बाकी गोष्टींचा सखोल तपास केला आणि तो या प्रकरणामध्ये समाविष्ट असल्याच्या निष्कर्षावरती आम्ही पोहोचलो. चेतन आणि सिया या दोघांनाही तपासात आणि चौकशीत कबुली दिलेली आहे. सियाला लग्न करायचं नव्हतं, त्यामुळं केतन अग्रवालला त्यांनी मिळून खून करून त्याला अपघाताचं स्वरूप दिलं आहे.
याआधी देखील त्याला संपवण्यासाठी प्रयत्न झाला असल्याची शक्यता आहे. यापूर्वीही ३१ मे रोजी, १४ जूनला सिया आग्रह करून केतनला लोहगडला घेऊन गेली होती त्यावेळी देखील त्यांनी प्रयत्न केला असल्याची शक्यता आहे, तपास सध्या प्राथमिक स्टेजला आहे, तपासात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Ketan Agrawal death : सिया आणि चेतनने आखलेल्या प्लॅनची A to Z स्टोरी
– दिवाळी पार्टीमध्ये चेतन चौधरीशी सिया गोयलची ओळख झाली, केतन अग्रवालशी लग्न नको म्हणून तिने तिच्या प्रियकरासोबत डाव आखला, हत्येच्या दिवशी कॅफेमध्ये बैठक आणि दुर्दैवी प्लॅन यशस्वी झाला.
१. ६ महिने, २३८ तास चर्चा, २००० फोन कॉल! सिया आणि चेतनमध्ये इतका वेळ प्रेमाचा संवाद झाला होता अशी माहिती सीडीआरमधून समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्यात ६ महिन्यापासून २००४ फोन कॉल झाले होते.
२. लोहगड किल्ल्यावर भर उन्हात हुडी, कानटोपी आणि मास्क घालून कोण जाऊ शकतो? पोलिसांना या गोष्टीचा संशय बळावला आणि ज्यावेळी हा व्यक्ती सीसीटिव्हीमध्ये दिसला तेव्हा तो सिया सोबत “साईन लँग्वेज” मध्ये बोलत असल्याचं दिसून आलं.
३. १४ जून रोजी सियाने केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्यावरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा डाव फसला, तेव्हा सियाने साप दिसला साप दिसला असा बहाणा केला आणि त्यातून तिने चुकून केतनला धक्का दिला.
४. सिया आणि आरोपी चेतन चौधरी यांची मागील वर्षी दिवाळीमध्ये एका पार्टीमध्ये ओळख झाली होती. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं त्यासाठी तिने चेतनला त्याला संपवण्याचा कट रचला.
५. ४ जून रोजी बाली मध्ये दोघांचा फोटोशूट होणार होतं, तेव्हा त्याच्यासोबत जायचं नाही म्हणून मुंबईच्या दिशेने जाताना एका फूड मॉलवर सियाने बॅग मधून केतनचा पासपोर्ट चोरला आणि बाथरूममध्ये जाऊन फाडून फ्लश करून टाकला. याशिवाय सियाने बालीला न जाता लोहगडला जाण्याचा हट्ट धरला होता.
६. २० जून रोजी सियाचा वाढदिवस होता, यासाठी केतन अग्रवालच्या वडिलांनी म्हणजे होणाऱ्या सासऱ्याने महाबळेश्वरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ७० रूम बुक केल्या होत्या.
७. घटनेला पूर्णत्वास आणण्यापूर्वी चेतन आणि सिया एका कॅफेमध्ये भेटले आणि केतन अग्रवाल याला कसं मारायचं प्लॅन बनवला. गडावर कुठला पॉईंट आहे का? तिथे त्याला ढकलले जाऊ शकते याचा प्लॅन आखला आणि तो दुर्दैवाने यशस्वी झाला.
Ketan Agrawal death : सियाने हत्येचा कट गुगल वर सर्च केला? सूत्रांची माहिती
केतन अगरवालच्या हत्येचा कट सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी रचला. पण सियाने हा कट गुगल वर सर्च करुन शिजवला. अशी माहिती सूत्रांनी दिलीये. तिच्या मोबाईलमध्ये त्या अनुषंगाने काही पुरावे आढळले आहेत. सूत्रांनी तशी माहिती दिलीये. गुगल वरुन घेतलेल्या माहितीच्या आधारे केतनची हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय, असं ही सूत्रांनी सांगितले
Siya Goyal : कोण आहे सिया गोयल?
– पुण्यातील व्यावसायिक प्रवीण गोयल यांची कन्या
– 20 वर्षीय सिया वाडिया कॉलेजमध्ये बी-कॉम शिक्षण ही घेत आहे
– गोयल कुटुंबीयांचा ड्राय फ्रुटस-मसालेचा व्यवसाय
– सियाला मात्र मार्केटयार्ड परिसरात केक विक्रीची बेकरी टाकून देण्यात आली
Chetan Choudhari: कोण आहे चेतन चौधरी?
– पुण्यातील व्यावसायिक बाबूलाल चौधरी यांचा मुलगा
– 23 वर्षीय चेतनने MMCC कॉलेजमध्ये बीबीए चं शिक्षण घेतलंय
– दोन वर्षांपासून मार्केटयार्ड येथील वडिलांचा ड्राय फ्रुट्स-किराणा ट्रेडर्स व्यवसाय तो पाहतो
– तो एक उत्तम क्रिकेटर सुद्धा आहे, रणजी क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न आहे.
Ketan Agarwal: कोण आहे केतन अगरवाल?
– पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा
– 25 वर्षीय केतन सिम्बॉयसिसमधून BBA चं शिक्षण घेतलं तर उच्चपदवी (MS) यूएसमधून घेतली.
– दोन वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण करुन तो भारतात आला आणि वडिलांच्या बांधकाम व्यवसायात उतरला
– गेल्या वर्षी स्वतः एक बांधकाम साईट्सची निर्मिती करायला सुरुवात केली
– फेब्रुवारी महिन्यात सिया सोबत साखरपुडा
– नोव्हेंबर महिन्यात बोहल्यावर चढण्यापूर्वी सिया आणि प्रियकर चेतनने हत्या केली
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.