केतनचं स्थळ आणलं, फोटो दाखवताच सिया काय म्हणाली?, सियाच्या आई-वडिलांनी पोलीस चौकशीत सगळं सांगित
केतन अग्रवाल पुणे लोहगड प्रकरण: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची काल (27 जून) चौकशी केली. काल ज्याची चौकशी करण्यात आली. यावेळी सियाचा भाऊ साहिल गोयल ही चौकशी दरम्यान उपस्थित होता. सियाच्या आई-वडिलांची तब्बल साडे अकरा तास कसून चौकशी करण्यात आली. सकाळी सव्वा अकरापासून लोणावळा ग्रामीण पोलीस विविध प्रश्नांची उत्तरं गोयल कुटुंबियांकडून जाणून घेतली. (Ketan Agrawal Pune Lohagadh Case)
पोलीस चौकशीत सियाने मला केतनसोबत लग्न करायचं नाही, हे कुटुंबीयांना सांगितल्याचं म्हटलं होतं. परंतु सियाच्या आई-वडिलांनी तिला तोंडावर पाडणारा जबाब पोलिसांना दिला आहे. केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं, असं सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांनी चौकशीत म्हटलं आहे. तसेच याआधी सियाच्या भावाचीही चौकशी करण्यात आली होती. यावेळी सियाच्या भावानेही केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं, अशी माहिती पोलिसांना दिली होती. (Ketan Agrawal Pune Lohagadh Case)
सियाच्या आई-वडिलांना चौकशीत विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे- (Ketan Agrawal Pune Lohagadh Case)
पोलीस सूत्रांनुसार-
प्रश्न : सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का?
उत्तर : सिया आणि चेतन मित्र आहेत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. सियाने चेतनबद्दल आम्हाला कधीचं काही सांगितलं नाही. त्यामुळं सिया आणि चेतनचे प्रेमसंबंध होते की नव्हते? याची आम्हाला काहीच कल्पना नाही.
प्रश्न : सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का?
उत्तर : सियाने चेतन नावाच्या मुलाशी लग्न करायचं आहे, असं एकदा ही सांगितलं नाही.
प्रश्न : सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का?
उत्तर : केतनचे स्थळ मित्तल यांनी आणलं. त्यावेळी आम्ही सियाला केतन अग्रवाल नावाच्या मुलाबाबत सांगितलं. त्याचे फोटो ही आम्ही तिला दाखवले. आधी तिची संमती घेतली आणि मगचं अग्रवाल कुटुंबीयांशी पुढची चर्चा झाली. लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सियाला केतन पसंत आहे का? याची आम्ही खात्री केली. तिचा होकार आल्यावरचं आम्ही लग्न करायचं ठरलं. तिची संमती होती, म्हणूनचं साखरपुडा ही घेण्यात आला.
प्रश्न : सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का?
उत्तर : लग्न ठरल्यापासून सिया आणि केतनचा संवाद सुरु होता. साखरपुडा झाल्यावर ते अनेकदा भेटले, फिरायला ही गेले. या दरम्यान केतन अनेकदा घरी पण आले, मात्र सियाने केतनचा स्वभाव पटत नाही. अशी तक्रार केली नाही.
प्रश्न : सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का?
उत्तर : सियाने मी केतनशी जबरदस्तीने लग्न करत आहे, असं एकदा ही म्हटलं नाही. ती आमची लाडकी लेक आहे, त्यामुळं आम्ही कोणतीही जबरदस्ती केलेली नाही.
प्रश्न : लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का?
उत्तर : याबाबत आम्हाला काहीचं कल्पना नव्हती
प्रश्न : साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का?
उत्तर : साहिलने स्वतः तो चेतनचा मित्र असल्याचं सांगितलं आहे. क्रिकेट खेळण्यासाठी ते एका मैदानावर भेटतात. साहिलचे तसे बरेच मित्र आहेत, त्यापैकी चेतन एक असू शकतो. मात्र साहिल आणि चेतनला आम्ही एकत्र कधी पाहिलं नाही.
प्रश्न : केतनच्या हत्येचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?
उत्तर : सियाने असं काही केलं असेल, यावर आमचा आज ही विश्वास बसत नाही. केतन आमच्या घरी यायचे, सियासोबत फिरायला जायचे. आम्ही नेहमीचं या दोघांना हसत-खेळत असल्याचं पाहिलंय. त्यामुळं असा काही कट रचला जातोय किंवा रचला गेलाय, याबद्दल मनात शंका येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
नेमकं प्रकरण काय? (Ketan Agrawal Pune Lohagad Case)
बालीचा बेत फसल्यानंतर, 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
संबंधित बातमी:
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.