IPL मुळे माझं करिअर उद्धवस्त झालं…; RCBच्या माजी भिडूचा खळबळजनक गौप्यस्फोट; क्रिकेट विश्वात ख
केविन पीटरसन आयपीएल कारकीर्द: इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने एक मोठा खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे. पीटरसन याने दावा केला की आयपीएलमुळे त्याचे करिअर उद्धवस्त झालं. तो म्हणाला की, आयपीएलमध्ये खेळण्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ सोबतचे त्याचे संबंध बिघडू लागले होते. त्या काळातील अनुभव सांगताना त्याने स्पष्ट केले की, त्याला अनेक त्याग केले आणि त्याचमुळे आज इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय खेळू शकत आहेत.
IPL मुळे माझं करिअर उद्धवस्त झालं…
पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाशी संवाद साधताना पीटरसन याने त्या काळातील परिस्थिती उलगडून सांगितली. तेव्हा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट असलेल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पाठवण्यास फारसे उत्सुक नव्हते. अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा उतार सुरू झाला, असे त्याने सांगितले.
पीटरसन म्हणाला की, “मी अनेक मोठे त्याग केले, माझं करिअर संपलं. त्यामुळेच बोर्डमधील अनेक जण माझ्या विरोधात गेले.” आज इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतात, यावर प्रतिक्रिया देताना त्याने हे विधान केलं. इंग्लंड संघाचा भाग असताना आयपीएलमध्ये खेळण्यामुळे त्याचे आणि ईसीबी अधिकाऱ्यांमधील संबंध बिघडले. या वादामुळे त्या काळात संपूर्ण क्रिकेटविश्वात मोठी चर्चा रंगली होती.
पीटरसन याने आपल्या 104 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 8,181 धावा केल्या. मात्र त्याचे मत आहे की, आयपीएलमुळे त्याचं करिअर वेगळ्याच दिशेला वळलं आणि त्याने 12-13 हजार कसोटी धावांसह आपली कारकीर्द संपवायला हवी होती. तो पुढे म्हणाला की, आयपीएलमध्ये खेळण्याचा त्याने घेतलेला कठोर निर्णयच आज इंग्लंडच्या खेळाडूंना कोणत्याही अडथळ्याशिवाय या स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा करून गेला आहे.
पीटरसनची आयपीएल कारकीर्द
पीटरसनने आपल्या आयपीएल कारकिर्दीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याने एकूण 36 आयपीएल सामने खेळताना 1,001 धावा केल्या. या कालावधीत त्याने एक शतक आणि 4 अर्धशतके झळकावली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.