अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला भाजपचीही साथ
खामगाव एपीएमसी : पश्चिम विदर्भातीएल सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Khamgaon Market Committee) सध्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तर स्थानिक राष्ट्रवादीचे नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालत होता. या कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण 18 सदस्य आहेत. तर सुभाष पेसोडे हे राष्ट्रवादीचे सभापती आहेत. मात्र आज खामगावच्या राजकारणात मोठी खळबळ उदलिया. कारण 18 पैकी 13 सदस्य हे काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अविश्वास प्रस्ताव दाखल करून अज्ञात वासात निघून गेलेत्यामुळे.
दरम्यानयेत्या 14 तारखेला या अविश्वासावर मतदान होणार आहे आणि हा अविश्वास प्रस्ताव पारित होऊन आता भाजपच्या साथीने काँग्रेसची सत्ता या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाला आहे.
अज्ञात वासात गेलेल्या सदस्यांची पक्षीय संख्या
काँग्रेस – 6
राष्ट्रवादी (एसपी) – १
वंचित – 3
भाजप – १
जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल,18 पैकी 13 सदस्य अज्ञातवासात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी खामगावात राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम विदर्भातीएल सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तर काँग्रेस नेत्याने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला भाजपचीही साथ लाभली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील स्थानिक नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सभापतीवर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आलाय. त्यामुळे 18 पैकी 13 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करून हे सर्व सदस्य अज्ञात मेघ गेल्याची माहिती आहे.
हे हि वाचा
आणखी वाचा
Comments are closed.