आधीच पक्षप्रवेश होईना, आता वैभव खेडेकरांना आणखी एक धक्का; खेड नगरपरिषदेचं नगराध्यक्षपद खुल्या म


Khed Nagarparishad Reservation : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. यात खेड नगरपरिषदेची नगराध्यक्षपदाची जागा ही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी सुटली आहे. यामुळे मनसेतून हकालपट्टी झालेले आणि भाजपमध्ये पक्ष प्रवेशासाठी वेटिंगवर असलेले माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे आणि गेल्या 20 वर्षांपासूनचे शिलेदार मानले जात होते. त्यांनी 2014 मध्ये वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर होते. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते. यापूर्वी त्यांचा थेट सामना शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत राहिला होता, पण अलिकडे हा संघर्ष कमी झाला. युवा वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची क्रेझ आहे. वैभव खेडेकर यांच्यावर आता मनसेच्या राज्य सरचिटणीस, कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी होती. मात्र काही दिवसांपूर्वीच वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

वैभव खेडेकर: वैभव खेडेकर यन्ना मोथा ढकलत आहेत

यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभव खेडेकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.  गणेशोत्सव काळात भाजपचे मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानुसार 4 सप्टेंबर रोजी नरीमन पॉईंट, मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र मराठा आंदोलनामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली होती. तेव्हापासून वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश रखडला आहे.  त्यातच खेड नगरपरिषदेचं नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे आधीच पक्ष प्रवेश रखडलेला असताना वैभव खेडेकर यांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nagarparishad Reservation Open Category मोठी बातमी: परळी, पंढरपूर, कागल, कळमनुरीसह 68 नगरपरिषदा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

आणखी वाचा

Comments are closed.