मालेगावात चार हजार बांगलादेशींना बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा

किरीट सोमैया: मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जन्म दाखला घोटाळा (Birth Certificate Scam) झाल्याचा दावा करीत, मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (दि.31) मालेगाव दौऱ्यावर आले होते. किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर जन्मदाखला मिळविण्यासाठी तिघांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे निष्पन्न झाले असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर 3977 बांगलादेशींनी खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र घेतले आहेत, या सगळ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

शुक्रवारी (दि. 31) किरीट सोमय्या यांनी मालेगावात येत छावणी पोलीस ठाणेमहापालिका व धान्य पुरवठा कार्यालयाला भेट दिली होती. छावणी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी त्यांनी बंद दाराआड चर्चा देखील केली होती. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, पंधरवड्यापूर्वी जन्म प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या 100 संशयितांच्या नावांची यादी पुराव्यासह पोलिसांना देऊन लेखी तक्रार दिली होती. त्याआधारे झालेल्या चौकशीत तिघांकडे भारतीय नागरिकत्व तसेच शहरात वास्तव्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. त्यानुसार सय्यद साजिद वाहब, शबाना बानो शेख हनिफ, नजमाबानो अब्दुल शारुर या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे, असे त्यांनी म्हटले होते.

3977 बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्र घेतले

सय्यद साजिद, शबाना बानो, नजमा बानो या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर 3977 बांगलादेशींनी खोटे कागदपत्रे देऊन जन्म प्रमाणपत्र घेतले आहे, असा आरोप देखील त्यांनी केलाय. तसेच या सगळ्यांची चौकशी, कारवाई होणार असल्याची माहिती देखील किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

‘मॉयनॉरीटी डिफेन्स कमिटी’तर्फे सोमय्यांचा विरोध

दरम्यान, मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख व समाजवादी पक्षाचे मुस्तकीम डिग्नेटी यांच्या नेतृत्वाखाली सोमय्या यांना विरोध करण्यासाठी ‘मॉयनॉरीटी डिफेन्स कमिटी’ची स्थापना करण्यात आली आहे.  किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर  ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’तर्फे शहरातील गांधी पुतळ्यावर सोमय्या यांना विरोध दर्शविण्यासाठी निदर्शने करण्यात आली. माजी आमदार आसिफ शेख, मुष्टकीन डिग्निटी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हातात ‘किरीट सोमय्या गो बॅक’चे फलक घेत व काळ्या फिती लावून निदर्शने केली होती.

आणखी वाचा

Birth Certificate Scam : सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, मालेगावात राजकीय संघटना एकवटल्या

अधिक पाहा..

Comments are closed.