पाणीटंचाईचे संकट असताना रस्ते धुण्यासाठी 213 टँकर कशासाठी? शिवसेनेचा पालिका प्रशासनाला सवाल
मुंबई महापालिकेने रस्ते धुण्यासाठी 213 टँकर रस्त्यावर उतरविण्याचे ठरवले आहे. मुंबईसमोर पाणीटंचाईचे संकट असताना रस्ते धुण्यासाठी इतक्या मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर करण्याची आवश्यकता काय? या टँकरमध्ये नेमके कोणते पाणी वापरले जाणार आहे? असा सवाल शिवसेनेने प्रशासनाला केला आहे.
मुंबईतील पाण्याची गळती रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? टँकरच्या माध्यमातून होणाऱया अनधिपृत पाणी उपशावर नियंत्रण आहे का? यापूर्वीही अशा प्रकारच्या प्रस्तावाला विरोध झालेला असताना पुन्हा तोच प्रस्ताव आणण्यामागे कोणाचे हितसंबंध आहेत? असा सवाल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
– मुंबईत अनेक ठिकाणी विकासकामांच्या आणि बांधकामांच्या नावाखाली बिल्डर लॉबीने जुन्या विहिरी बुजवल्याच्या तक्रारी आहेत. या विहिरींची माहिती संकलित करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महानगरपालिका पुढाकार घेणार आहे का? सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये यासाठी इच्छाशक्ती आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.
Comments are closed.