अखेर वनवास संपला! सलग पराभवांच्या अंधारानंतर रिंकू सिंगने पेटवला केकेआरच्या विजयाचा दिवा; शेवटच

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स IPL 2026 : आयपीएल 2026 च्या हंगामात सलग अपयशाचा सामना करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) अखेर विजयाचे खाते उघडले आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय या जोडीने अशक्य वाटणारा विजय खेचून आणत राजस्थान रॉयल्सचा चार गडी राखून पराभव केला. केकेआरचा या हंगामातील हा पहिलाच विजय ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीची पुन्हा तुफानी फटकेबाजी

वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी राजस्थान रॉयल्ससाठी डावाची सुरुवात केली. त्यांनी 8.4 षटकांत पहिल्या विकेटसाठी 81 धावा जोडल्या. संघाची पहिली विकेट वैभवच्या रूपाने पडली. 6 चौकार आणि 2 षटकारांसह 28 चेंडूंमध्ये 46 धावा करून तो वेल्लियनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ ध्रुव जुरेल बाद झाला, त्याने 5 धावा केल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वालही बाद झाला. त्याने 29 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा केल्या. त्यानंतर संघाला रियार परागच्या (12) रूपाने चौथा धक्का बसला. शेवटी शिमरॉन हेटमर्नने 15 धावा केल्या आणि रवींद्र जडेजाने 9 धावांचे योगदान दिले.  कार्तिक त्यागी आणि वरुण चक्रवर्तीने कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वाधिक 3-3 बळी घेतले.

सलामीवीर स्वस्तात बाद, मधल्या फळीचा संघर्ष

धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर टीम सायफर्ट आणि कर्णधार अजिंक्य रहाणे भोपळा न फोडता स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशी (10) आणि कॅमेरून ग्रीन (27) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र रवि बिश्नोई आणि रवींद्र जडेजाने त्यांना फार काळ टिकू दिले नाही. रॉवमन पॉवेलने 23 धावांची भर घातली, पण तो देखील मोक्याच्या क्षणी बाद झाला.

अनुकूल अन् रिंकू सिंगने खिंड लढवली

केवळ 85 धावांवर सहा महत्त्वाचे फलंदाज तंबूत परतल्याने केकेआर हा सामना गमावणार असे चित्र दिसत होते. राजस्थानच्या गोलंदाजांनी सामन्यावर पूर्ण पकड मिळवली होती. सहा गडी बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय यांनी संयमी पण आक्रमक खेळी करत सामन्याचे चित्र पालटले. या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद 76  धावांची अभूतपूर्व भागीदारी रचली. या जोडीच्या जिद्दीमुळे केकेआरने 19.4 षटकांत 6 गडी गमावून 161 धावा केल्या आणि हंगामातील आपल्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

हे ही वाचा –

Who is Anushka Sharma Debut Sa vs Ind 2nd T20I : कोण आहे अनुष्का शर्मा?, संघर्षातून थेट सातासमुद्रापार… टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत स्वप्नवत पदार्पण, द. आफ्रिकेला घाम फुटला

आणखी वाचा

Comments are closed.