केएल राहुलचा पराक्रम! गौतम गंभीरचा मोठा विक्रम मोडीत; आता रोहित शर्माला मागे टाकण्याची संधी

गॉलच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. हा भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील 600 वा कसोटी सामना आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 47 धावा जोडल्या. यादरम्यान केएल राहुलने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलने चौकार मारताच कसोटी क्रिकेटमध्ये गौतम गंभीरचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. गौतम गंभीर सध्या भारतीय कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. केएल राहुलने गौतम गंभीरला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये मागे टाकलं आहे. हा रेकॉर्ड केएल राहुलने गौतम गंभीरसमोरच मोडून काढला आहे.

या कसोटी सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी केएल राहुलच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये 68 सामन्यांमध्ये 4153 धावा करण्याची नोंद होती. तर गंभीरच्या नावे 4154 धावा करण्याची नोंद होती. यादरम्यान चौकार मारताच केएल राहुलने कसोटी क्रिकेटमधील या रेकॉर्डमध्ये गौतम गंभीरला मागे टाकलं आहे. केएल राहुलकडे आता कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माला मागे टाकण्याची संधी असणार आहे. रोहित शर्माच्या नावे 4301 धावा करण्याची नोंद आहे. जर त्याने एक शतक झळकावलं, तर तो रोहित शर्माला मागे सोडू शकतो.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनच्या नावे सर्वाधिक 15921 धावा करण्याची नोंद आहे. तर राहुल द्रविडच्या नावे 12365 धावा करण्याची नोंद आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या सुनिल गावसकरांच्या नावे १०१२२ धावा करण्याची नोंद आहे. तर चौथ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीने 9230 धावा केल्या. तर व्हीव्हीएस लक्ष्मणने 8781 धावा केल्या आहेत. केएल राहुल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत 13 व्या स्थानी आहे.

Comments are closed.