किंग्स चार्ल्स यांनी हिंदुस्थानचा कोहिनूर परत करावा, न्यू यॉर्कचे महापौर ममदानी यांची जाहीर विनंती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी बुधवारी (29 एप्रिल 2026) एक वक्तव्य करत ब्रिटनच्या राजघराण्याबद्दल सूचक नाराजी व्यक्त केली. किंग चार्ल्स तिसरे यांच्याशी खासगीत बोलण्याची संधी मिळाली, तर हिंदुस्थानचा ऐतिहासिक ‘कोहिनूर’ हिरा परत करण्याची विनंती करेन, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या 9/11 स्मृतिदिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.

लोअर मॅनहॅटनमध्ये आयोजित पुष्पचक्र अर्पण कार्यक्रमात ममदानी आणि किंग चार्ल्स यांची भेट होणार आहे. यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममदानी यांनी कोहिनूर हिऱ्याचा मुद्दा उपस्थित करत तो ब्रिटिश राजमुकुटात असून सध्या टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले. या हिऱ्यावर हिंदुस्थानसह इराण आणि पाकिस्ताननेही दावा केला आहे. ब्रिटिश राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी मात्र या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला हे अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली असून ते 9/11 स्मृतिदिन कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत

Comments are closed.