महिला आणि पुरुष नग्न होऊन अमावस्येला स्मशानात, राखेखाली बाहुली, कोल्हापुरात भानामतीचा प्रकार

कोल्हापूर : पुरोगामी भूमी असलेल्या कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून भानामती, काळी जादूचे अनेक प्रकार सातत्याने समोर येत आहेत. शिरोळ तालुक्यातील उदगावच्या वैकुंठधाममध्येही असेच एक अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एका महिला आणि पुरुषाकडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार सुरू आहेत. हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे.

जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ आणि नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आलं.

नग्न होऊन पुरुष-महिलेची अघोरी पूजा

या प्रकारानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यामध्ये एका महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आला.

सीटीटीव्हीत दिसणारा पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाम मध्ये आल्याचं दिसून आलं. आमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.