सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी लाच, उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

कोल्हापूर लाच प्रकरण : कोल्हापूमध्ये एसीबीद्वारे मोठी कारवाई केली आहे. यात सात बारावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी acbद्वारे (ACB) उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ (Kolhapur Crime) पकडलंहे. शिंगणापूरचे ग्राम महसूल अधिकारी आणि उपसरपंच या दोघांनी मिळून हि लाच घेतल्याची माहिती आहे. इरफान सनदी आणि दीपक कांबळे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंहे. दहा हजार पैकी पाच हजाराची रक्कम स्वीकारताना हि कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपींच्या घरांची देखील झाडाझडती घेतली. यात बांधकाम कामगारांच्या नावाने बोगस कागदपत्रे सादर करून शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Solapur News: बांधकाम कामगारांच्या नावाने बोगस कागदपत्रे सादर करून शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण

दुसरीकडे सोलापूरमध्येहे असाच एक प्रकार समोर आला आहे. बांधकाम कामगारांच्या नावाने बोगस कागदपत्रे सादर करून शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी निलंबित केलेल्या तीन अधिकाऱ्यांसह 20 जणांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. बोगस कागदपत्रे सादर करून शासनाचा निधी लाटल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील तीन अधिकारी आणि बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील 17 कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Solapur Crime News :  20 जणांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसारउच्च शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना राज्य शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते. या 20 आरोपीनी 251 कामगारांचे बनावट कागदपत्रे सादर करून 455 प्रस्ताव सादर करत एकूण 3 कोटी 63 लाख 20 हजारांचा निधी लाटलाहे. या संदर्भात सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी नोंदणी अधिकारी ए. आर. पवार, दुकान निरीक्षक एस. डी. राजपूत, ऊ. च. सूर्यवंशी या तिघांना निलंबित केलं होतं. आता या तिघांसह एकूण 20 जणांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.