मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, शिक्षण क्षेत्राला काळिमा फसणारी घटना
कोल्हापूर क्राईम न्यूज : कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षण क्षेत्राला काळिमा फसणारी घटना घडली आहे. एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील एका आश्रम शाळेतील मुख्याध्यापकाने हा संतापजनक प्रकार केला आहे.
जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
दरम्यान, याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पीडित मुलगी आणि तिच्या आईने पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर महिला सहाय्य कक्षात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. 2025 च्या ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान दोनवेळा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी संशयित कृष्णा दाभोळे या मुख्याध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील करत आहेत.
कृष्णा दाभोळे असं संशयित आरोपी असलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पीित मुलगी आणि तिच्या आईच्या तक्रारीवरुन जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, दोन वेळा अल्पवयीन मुलीवर कृष्णा दाभोळे या मुख्याध्यापकाने अत्याचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे. शिक्षण क्षेत्राला काळिमा फसणारी घटना घडली असल्याचं बोललंल जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Akola crime: आधी सख्ख्या बापाने पोटच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले नंतर काका अन् शेजारच्या म्हाताऱ्यानेही लैंगिक शोषण केलं, अकोल्यातील संतापजनक घटना
आणखी वाचा
Comments are closed.