आईवरुन शिवी दिल्यानं कोल्हापुरात मित्रानेच केला मित्राचा खून, चार तासातच आरोपीला अटक
कोल्हापूर गुन्हेगारीच्या बातम्या: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. आई वरुन शिवी दिल्यामुळे कोल्हापुरात मित्रानेच केला मित्राचा रक्त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हनुमान नगरमध्ये ही घटना घडली आहे. 70 वर्षीय मोहन सूर्यकांत पोवार यांनी किरकोळ वादातून आई वरुन शिवी दिल्याने त्यांचा गळा चिरुन केला आहे. गळा चिरून खून केल्यानंतर खोलीला लावली आग लावल्याचा प्रकार देखील केला आहे.
आरोपी चंद्रकांत केदारी शेळकेला अटक
खून प्रकरणी संशयित आरोपी चंद्रकांत केदारी शेळके या 73 वर्षीय वृद्धास पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या चार तासातच पोलिसांनी खुनाचा उलघडा केला आहे. जुना राजवाडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची संयुक्त कारवाई केली आहे.
पनवेलमध्ये जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला
पनवेलमध्ये (Panvel) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खून प्रकरणात जामीनावर सुटलेल्या आरोपीने पोलिसांवर (Police) कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. तसेच स्वतःच्या भावाच्या 16 वर्षीय मुलीला ओलीस ठेवत तिच्या गळ्यावर कोयता ठेवून धमकी दिल्याचा प्रकार देखील घडला आहे. या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण आहे. सोबन बाबुलाल महातो असं या आरोपीचं नाव आहे. सोबन महातो याने बुधवारी रात्री पनवेल शहरात चांगलाच कहर माजवला. मंगला निवास इमारत स्वतःच्या मालकीची असल्याचा दावा करत त्याने एका खोलीचे कुलूप तोडून प्रवेश केला तसेच बाहेर पडणार नसल्याची भूमिका घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप केला असता त्याने कुऱ्हाड आणि कोयत्याने पोलिसांवर हल्ला केला. या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत, तर काहींना किरकोळ मार लागला आहे. एवढ्यावरच न थांबता सोबनने स्वतःच्या भावाच्या 16 वर्षीय मुलीला ओलीस ठेवत तिच्या गळ्यावर कोयता ठेवून धमकी दिली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोबन बाबुलाल महातो याने इमारत स्वतःची असल्याचा दावा करुन रहिवाशांना धमक्या दिल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच त्याने कुऱ्हाडीने हल्ला केला. सम्राट डाकी आणि रविंद्र पारधी हे दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Ratnagiri Crime News: पहिला खून प्रेयसीशी अश्लील बोलतो म्हणून; दुसरा पुरावा हटवण्यासाठी अन् तिसऱ्या भक्तीच्या खूनामुळे सगळंच कांड आलं समोर, मृतदेहांसह पुरावे दरीत
आणखी वाचा
Comments are closed.