ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
कोल्हापूर निवडणूक 2025: कोल्हापूर (Kolhapur Politics) जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Local Body Elections) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. काल (शुक्रवारी) रात्री कोल्हापुरात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil), शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) आणि सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचे ठरले आहे. तथापि, जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसून तो स्थानिक पातळीवर आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चेनंतर घेतला जाणार आहे.
Kolhapur Election 2025: स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सोबत येणार?
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन घटक पक्ष आहेत. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या आघाडीत सहभागी व्हावी, यासाठी पुढील दोन दिवसांत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. हा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये महायुतीसाठी आव्हान निर्माण होणार आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्रितपणे रणनीती आखत असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
Local Body Elections: 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड या दोन नगरपंचायतींसह गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि पेठवडगाव या 11 नगरपरिषदांचा समावेश आहे.
Local Body Elections: 10 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष निवडणुकीचा धुरळा
या सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी सदस्यपद आणि थेट नगराध्यक्षपदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल. या घोषणेनंतर मंगळवारपासून संबंधित कार्यक्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरणे, प्रचार रणनीती आखणे आणि स्थानिक नेत्यांशी चर्चांचा फेऱ्यांना आता गती मिळाली आहे. 10 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष निवडणुकीचा धुरळा उडणार असून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
Maharashtra Local Body Elections Timetable : असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल
नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.