कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल…
कोलकाता विद्यार्थ्यांचा निषेध: नीट (NEET) पेपर फुटीप्रकरणावरून देशभरात सध्या तीव्र संतापाची लाट पसरल्याचे चित्र आहे. अशातच हा जनआक्रोश आणि ‘जेन झी’ (Gen Z) विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर (Student Protest) केंद्र सरकारला अखेर एक पाऊल मागे घेत युवाशक्ती पुढं नमतं घ्यावं लागले आहे. परिणामी तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला आहे. असे असताना नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधात पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी मोठा हिंसाचार (KolkataStudent Protest) घडल्याचे बघायला मिळाले. या आंदोलनादरम्यान हिंसाचार घडवल्याचा आरोप असलेल्यांविरुद्ध ‘गुंडा कायद्या’ची (West Bengal Gunda Act) अंमलबजावणी केली आहे, असे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी शनिवारी सांगितले. याप्रकरणीतील दोषींना पुढील तीन पिढ्या लक्षात ठेवतील, अशी शिक्षा दिली जाईल, असा गंभीर इशारा देखील मुख्यमंत्री अधिकारी यांनी दिला आहे. (Suvendu Adhikari onKolkata Student Protest)
West Bengal Gunda Act : बंगालमध्ये पहिल्यांदाच ‘गुंडा कायदा’ लागू, हिंसाचारप्रकरणी कठोर शिक्षेचा इशारा
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या ‘नीट’ (NEET) विरोधी निदर्शनांदरम्यान हिंसाचार घडवून आणणाऱ्यांविरुद्ध राज्याने पहिल्यांदाच आपल्या नवीन ‘गुंडा विरोधी कायद्या’चा (अँटी-गुंडा ॲक्ट) वापर केला आहे. शनिवारी विधानसभेत निवेदन करताना अधिकारी म्हणाले की, धर्मतला येथील रॅलीतून ओळख पटवण्यात आलेले सुमारे 70 लोक हे विद्यार्थी नव्हते आणि त्यांचा ‘नीट’ पेपरफुटीच्या कथित प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाशी कोणताही संबंध नव्हता. पोलिसांच्या माहितीनुसार, मेटियाबुर्जचा रहिवासी असलेल्या मोहम्मद अफ्रोजला अंडाल येथून अटक करण्यात आली आहे आणि आतापर्यंत इतर नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Suvendu Adhikari: अशी शिक्षा दिली जाईल जी त्यांच्या पुढील तीन पिढ्या लक्षात ठेवतील
निदर्शनादरम्यान पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करताना ते म्हणाले की, दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी ‘पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजकंटकांच्या कारवायांवर नियंत्रण कायदा, 2026’ जो सामान्यतः ‘गुंडा ॲक्ट’ म्हणून ओळखला जातो तो लागू करण्यात आला आहे. तसेच, त्यांना अशी शिक्षा दिली जाईल जी त्यांच्या पुढील तीन पिढ्या लक्षात ठेवतील, असा इशाराही त्यांनी दिला. संपूर्ण सभागृहाच्या वतीने मी आमच्या पत्रकार मित्रांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. पत्रकारांवरील हल्ला अस्वीकार्य आहे. आम्ही ‘गुंडा ॲक्ट’ अंतर्गत अशी कारवाई करू की हे गुंड आणि त्यांच्या पुढील तीन पिढ्याही ती लक्षात ठेवतील. म्हणूनच हा कायदा करण्यात आला आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
पश्चिम बंगाल गुंडा कायदा : पोलिसांनी दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा आहे
अधिकारी यांनी आरोप केला की, जेव्हा हा मोर्चा एस्प्लेनेड (Esplanade) येथे पोहोचला, तेव्हा आधी पोलिसांवर आणि नंतर निदर्शनांचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर बूट आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. त्यांना हवे होते की पोलिसांनी लाठीचार्ज करावा आणि अश्रूधुराचा वापर करावा. त्यांना तसा तमाशा हवा होता. पण कोलकाता पोलिसांनी त्यांना ती संधी दिली नाही. पोलिसांनी दाखवलेली संयमाची भूमिका कौतुकास्पद आहे, असे ही ते म्हणाले. त्यांचा विद्यार्थी चळवळीशी काहीही संबंध नाही. ते विद्यार्थीही नाहीत आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या संघटनेचे सदस्यही नाहीत. ते केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी आले होते, असा आरोप त्यांनी केला. शुक्रवारी एसएसकेएम (SSKM) रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रसारमाध्यमांवरील हल्ल्याचा मुद्दा सभागृहासमोर मांडणे आवश्यक होते. या हिंसाचाराच्या संदर्भात सात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Comments are closed.