भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्…
अकोला : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे, याचा विसर पोलिसांना पडलाय, याची प्रचीती देणारी घटना समोर आली आहे. अकोल्यातल्या बाळापूरात भाड्याच्या (Akola Crime News) घरात राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मात्र, या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्याचा प्रयत्न (Akola Crime News) केला. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून ती कोमात आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस कर्मचारी हा फरार आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच नाव पवन वडगावे असं नाव आहे.(Akola Crime News)
अकोल्यात रक्षकच भक्षक बनलाय. लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस कर्मचाऱ्यांनी एका मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप होतोय. दरम्यान, घटनेनेनंतर तरुणीने स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला होता. पीडित तरुणीचा मृत्यू झाला, आरोपी पोलिस कर्मचारी अटक नाहीये. त्यामुळं संबंधित ठाणेदार आणि आरोपी पोलिसाला मदत करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी शेडको समाज बांधव आणि नातेवाईकांचा पोलिस उपविभागीय कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन चाललं आहे. दरम्यान, या प्रकरणात बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो तिथेच कार्यरत होता. त्यामुळे येथील पोलीसांनी पवन वडगावे’ला फरार होण्यास मदत केल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. दुसरीकडे हा तपास स्थानिक पोलिसांकडून वरिष्ठ पातळीवर वर्ग करण्याची मागणी होतीये. मुलगी अल्पवयीन होती तेव्हापासून तिच्यावर आरोपी अत्याचार करत असल्याने त्याच्यावर पॉस्को लावण्याची मागणी होतीये.(Akola Crime News)
Akola Crime News: पोलीस कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाला अत्यंत दुर्दैवी वळण लागलं आहे. घरात भाड्याने राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावरती उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दरम्यान, आरोपी पोलीस कर्मचारी अद्याप फरार असून, त्याच्या तातडीने अटकेची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
Akola Crime News: आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
बाळापूरमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्यावर घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर अवस्थेत तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय.या घटनेनंतर शेकडो समाज बांधव आणि नातेवाईकांनी पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीला तातडीने अटक करण्याची, त्याला मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची आणि या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची मागणी केली. तसेच, पीडित मुलगी अल्पवयीन असतानापासून अत्याचार होत असल्याचा आरोप करत आरोपीवर पॉक्सो कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली. सध्या पीडितेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या प्रकरणामुळे बाळापूरसह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Comments are closed.