उपकर्णधार टिळक वर्माला त्वरित डच देण्याची वेळ आली आहे…; माजी मुख्य निवडकर्त्याची मोठी मागणी

टिळक वर्माच्या भूमिकेत क्रिस श्रीकांत: भारतीय क्रिकेट संघ सध्या टी-20 क्रिकेटमधील अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाने सलग चार टी-20 सामने गमावले असून, फलंदाजीची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे. विशेषतः नॉटिंगहॅम येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा संपूर्ण डाव अवघ्या 76 धावांत गारद झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर संघ व्यवस्थापनाच्या निर्णयांवर जोरदार टीका होत असून, भारताचे माजी सलामीवीर आणि बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना तिलक वर्माच्या फलंदाजीवर आणि त्याच्या वापराच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तिलक वर्माला आता संघातून बाहेर करण्याची वेळ आली आहे.”

‘तिलकला नेमकं काय करायचं हेच समजत नाही…’ – श्रीकांत

श्रीकांत म्हणाले, “तिलक वर्मा आधीच भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार आहे आणि लवकरच तो कर्णधारही होईल, अशी चर्चा सुरू आहे. पण त्याचा खेळ पाहता अनेक प्रश्न निर्माण होतात. वेगवान आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंविरुद्ध त्याला अडचण येते, हे सर्वांनाच माहीत आहे.”

ते पुढे म्हणाले, “जर तिलक तुमचा मुख्य फलंदाज आणि उपकर्णधार असेल, तर मग त्याला वेगवान गोलंदाजांपासून का वाचवलं जातं? त्याच्या आधी अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवलं जातं. याचा अर्थ संघ व्यवस्थापनालाही माहिती आहे की तिलक शॉर्ट-पिच चेंडूंविरुद्ध कमकुवत आहे.”

‘मी सतत सांगतोय, तिलकला बाहेर करा’ – श्रीकांत

1983 च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या श्रीकांत यांनी निवड समितीवरही अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, “मी सातत्याने सांगत आहे की तिलक वर्माला संघाबाहेर करा. पण तरीही त्याला संधी दिली जात आहे.” नॉटिंगहॅममध्ये झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात तिलक वर्मा केवळ 11 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. संपूर्ण डावात तो पूर्णपणे संघर्ष करताना दिसला. भारताचा संपूर्ण डाव 76 धावांत आटोपल्याने इंग्लंडमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली.

संजू सॅमसनला पुन्हा संधी द्यावी

श्रीकांत यांनी तिलक वर्माच्या जागी अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याला संघात स्थान द्यावे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “माझ्या मते तिलक वर्माऐवजी संजू सॅमसनला अंतिम अकरामध्ये खेळवायला हवं. तो अधिक प्रभावी ठरू शकतो.” आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध सलग तीन सामन्यांतील अपयशानंतर संजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्याच्या जागी अवघ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी देण्यात आली. मात्र, त्यालाही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे भारताच्या संपूर्ण फलंदाजीवर आणि संघ निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे ही वाचा –

बस्स, आता पुरे! सलग पराभवांनी BCCI संतापलं, टीम इंडियाच्या अपयशानंतर गौतम गंभीरच्या कामगिरीची होणार समीक्षा

Comments are closed.