क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर पहिलीच महिला कसोटी मॅच! JioHotstar की SonyLIV? भारत-इंग्लंड कसोटी कुठ

भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला लाइव्ह स्ट्रीमिंग अपडेट: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना आज शुक्रवार (10 जुलै) पासून लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना महिला क्रिकेटसाठी अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहे. कारण, 142 वर्षांच्या लॉर्ड्सच्या इतिहासात प्रथमच महिला कसोटी सामना खेळवला जात आहे. याआधी या मैदानावर अनेक संस्मरणीय कसोटी सामने झाले, मात्र ते सर्व पुरुष क्रिकेटमधील होते. महिला क्रिकेटसाठी हा सुवर्णक्षण असला तरी भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ टी-20 विश्वचषक 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर या कसोटीत उतरतील. भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला, तर यजमान इंग्लंडला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

भारत विरुद्ध इंग्लंड महिला कसोटी कधी, कुठे, वाजता सुरू होईल?

भारत महिला आणि इंग्लंड महिला यांच्यातील एकमेव कसोटी सामना शुक्रवार, 10 जुलै रोजी सुरू होणार आहे. हा ऐतिहासिक सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तर सामन्याची नाणेफेक दुपारी 3.00 वाजता होणार आहे.

थेट प्रक्षेपण, लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

भारतातील प्रेक्षकांना या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Sports Network वरील विविध टीव्ही चॅनेल्सवर पाहता येईल. भारत-इंग्लंड महिला कसोटीचे लाईव्ह स्ट्रीमिंग SonyLIV अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. तसेच JioHotstar अॅप आणि वेबसाइटवरही हा सामना थेट पाहता येणार आहे.

भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघ

इंग्लंड: नॅट स्कायव्हर-ब्रंट (कॅप), टॅमी ब्युमाँट, लॉरेन बेल, माइया बुशियर, ॲलिस कॅप्सी, टिली कोर्टनी-कोलमन, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फायलर, एमी जोन्स, हीदर नाइट, एम्मा लुंब, ग्रेस पॉट्स, एली थ्रेलिलर्स, मॅडी व्हिलील्ड्स, मॅडी.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, क्रांती गौड, रिचा घोष, प्रिया पुनिया, स्नेह राणा, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्स, सायली सातघरे, शफाली वर्मा, नंदनी शर्मा, दीप्ती शर्मा, एन. श्री चरानी.

लॉर्ड्सवरील पहिल्याच महिला कसोटीमुळे हा सामना क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार असून, इंग्लंडचा संघही घरच्या मैदानावर विजयाने या ऐतिहासिक सामन्याची नोंद संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करेल.

हे ही वाचा –

Shapoor Zadran Passes Away : अलविदा शापूर! जनाजा पाहताच ढसाढसा रडला राशिद खान; अफगाण क्रिकेट शोकसागरात, रवि शास्त्रींची पोस्ट व्हायरल, पाहा सुन्न करणारा VIDEO

Comments are closed.