महाडमधील मुख्याधिकारी मारहाण प्रकरणाला 16 तास उलटले, भाजप नगरसेवकाला अजूनही अटक नाही, नेमकं प्र

रायगड क्राईम न्यूज: डोंबिवलीत (Dombivli) शिंदे गटाच्या नगरसेवकाने डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता रायगड जिल्ह्यातील महाडमधूनही असाच एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर (Dhananjay Kolekar) यांना भाजप नगरसेवक (BJP Corporator) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दालनात घुसून बेदम मारहाण केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेला 16 तास उलटून गेले तरी मुख्य आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Raigad Crime News:  नेमकं काय घडलं?

महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे गुरुवारी दुपारी आपल्या दालनात शासकीय कामकाज करत होते. त्याच वेळी भाजप नगरसेवक सूरज बामणे हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह तिथे आले. महाडमधील प्रभाग क्रमांक ६ मधील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला चढवत त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर मारहाण केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे.

Raigad Crime News: 16 तास उलटले तरी आरोपीची केवळ ‘चौकशीच’ सुरू

याप्रकरणी नगरसेवक सूरज बामणे आणि त्यांच्या तीन कार्यकर्त्यांवर महाड शहर पोलीस ठाण्यात (Mahad City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेला 16 तास उलटूनही मुख्य आरोपीला अटक (Arrest) करण्यात आलेली नाही. महाडचे पोलीस निरीक्षक नारायण शिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आला असून सध्या केवळ चौकशी सुरू आहे. आरोपीला अटक होण्यास होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Raigad Crime News: भाजपकडून आरोपी नगरसेवकाची पाठराखण?

दुसरीकडे, भाजपचे रायगड उपजिल्हाध्यक्ष बिपिन महामुणकर यांनी आरोपी सूरज बामणे यांची बाजू घेतली आहे. “सूरज यांनी जे केले ते जनतेसाठी केले. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी तिथे उद्रेक केला. मी या झटापटीचे समर्थन करणार नाही, मात्र त्यांनी केलेले काम हे पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत आवश्यक होते,” असे म्हणत भाजप नेत्यांनी बामणे यांची पाठराखण केल्याचे चित्र दिसत आहे.

Raigad Crime News: डोंबिवलीतील घटनेची पुनरावृत्ती

काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण केली होती. याप्रकरणी विरोधी पक्षातील नेते आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आगपाखड करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर डोंबिवली पोलिसांनी तातडीने म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. डोंबिवली नंतर महाडमध्ये मुख्याधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा

Comments are closed.