निदा खानला जामीन देताना भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; नेमकं काय घडलं
नाशिक टीसीएस प्रकरण निदा खान : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत घडलेले महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण (Conversion Case) गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिला अटक करण्यात आली होती. मात्र, ती पाच महिन्यांची गर्भवती (Pregnant) असल्याने नाशिकरोड न्यायालयाने (Nashik Road Court) तिला न्यायालयीन विवेकाधिकाराचा वापर करत जामीन मंजूर केला आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या निदा खानला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Nashik TCS Case Nida Khan: न्यायालयाने दिला भगवान श्रीकृष्णाचा दाखला
या प्रकरणाची सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. न्यायालयाने आपल्या विस्तृत आदेशात म्हटले की, “भगवान श्रीकृष्णाप्रमाणे जेलमध्ये बाळाला जन्म देण्याची वेदना आणि सामाजिक कलंक कोणत्याही महिलेसाठी असह्य असतो. कोणत्याही निष्पाप मुलाला तुरुंगात जन्माचा मानसिक आघात आणि सामाजिक कलंक सहन करावा लागू नये.” बाळाच्या हिताचा आणि मानवी हक्कांचा सर्वोच्च विचार करून न्यायालयाने हा निर्णय घेतल्याचे आदेशात नमूद केले आहे.
Nashik TCS Case Nida Khan: प्रथमदर्शनी चौकशीत काय समोर आले?
न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले की, टीसीएस प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत प्रथमदर्शनी असे दिसते की, निदा खानने इतर सहआरोपींसोबत मिळून पीडितेला मानसिकदृष्ट्या प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन करून ‘हिंदू धर्म ठीक नाही’ असे सांगत तिची विचारसरणी आणि धर्म बदलण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये स्पष्टपणे आहे. लैंगिक छळ आणि धर्मांतरणाशी संबंधित या प्रकरणात निदा खानची भूमिका महत्त्वाची असल्याचे न्यायालयाने मान्य केले.
Nashik TCS Case Nida Khan: आरोपी सध्या 5 महिन्यांची गर्भवती
सुमारे दोन महिन्यांपूर्वी अटक झालेल्या निदा खानला न्यायालयाने 6 जुलै रोजीच जामीन मंजूर केला होता, ज्याचा सविस्तर आदेश आता उपलब्ध झाला आहे. न्यायाधीश म्हणाले, “आरोपी सध्या 5 महिन्यांची गर्भवती आहे. याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल झाले आहे. अशा परिस्थितीत तिला पुढील न्यायिक कोठडीत ठेवण्याचे कोणतेही कायदेशीर औचित्य नाही.” न्यायालयाने तिची 75 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले.
आणखी वाचा
Comments are closed.