जयंत पाटलांना 40 वर्षात ईश्वरपूरचा रस्ता बांधता आला नाही अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला;

Gopichand Padalkar on Jayant Patil: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai-Pune Expressway) अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्याच्या (Landslide) दुर्घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर पलटवार केलाय.

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. अल्पकालीन चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हजारो कोटींचा खर्च करून उभारण्यात येत असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा प्रकल्प राबविताना हवामान बदलाचा आणि भौगोलिक जोखमींचा पुरेसा अभ्यास झाला होता का? तसेच या प्रकल्पाचे ‘क्लायमेट ऑडिट’ का करण्यात आले नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

Gopichand Padalkar on Jayant Patil: गोपीचंद पडळकरांचे सडेतोड उत्तर

जयंत पाटलांच्या या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “ज्याला सांगली ईश्वरपूरचा रस्ता 40 वर्षात करायचं जमलं नाही तो चालला आहे कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला. बारामती ते फलटण बरेच वर्ष रस्ता नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि तो हायवे तयार झाला. यांना गावातलं कळेना आणि हे निघाले कनेक्टिंग लिंकवर बोलायला,” अशी टीका त्यांनी जयंत पाटील यांच्यावर केलीय.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, “1853 ला इंग्रजांनी मुंबई पुणे रस्ता तयार करण्यासाठी एक समिती नेमली. त्यावेळी गोरे लोक रस्ता शोधत होते, त्यावेळी तिथं एक मेंढपाळ होता, त्याने विचारणा केली नेमके हे काय करत आहेत? त्याने पुण्याला जायचा रस्ता सांगितला. त्यावेळी इंग्रज अधिकारी खुश झाला. अधिकाऱ्यानं विचारलं तुम्हाला काय पाहिजे आहे? त्याने तुम्ही भारतातून निघून जा असं सांगितलं. त्या इंग्रजाने त्या मेंढपाळाला गोळ्या घातल्या. त्या धनगराचं नाव वीर शिंग्रोबा धनगर होतं. म्हणून माझी मागणी आहे त्या कनेक्टिंग लिंकला वीर शिंग्रोबा धनगर नाव द्या,” असे देखील त्यांनी म्हटले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Operation Tiger 3: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? ‘ऑपरेशन टायगर 3’च्या वेगवान हालचाली ; ठाकरेंचे 10 आमदार अन् शरद पवारांचे खासदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर

Comments are closed.