कुडाळ देशस्थ वैश्य क्रेडिट सोसायटीची 102 वी वार्षिक सभा
कुडाळ देशस्थ वैश्य को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा लालबागच्या महाराष्ट्र सेवा मंडळ, गणेशगल्ली येथे पार पडली. या सभेत उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नवीन उपविधीची स्वीकृती व अंमलबजावणी कशी करावी याचे सभासदांना प्रशिक्षण देण्यात आले व विविध ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले.
वैश्य समाज विश्वस्त अशोक पारकर व सोसायटीचे अध्यक्ष गजानन रेवडेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सभेला सुरुवात झाली. सभेत सचिव प्रज्ञा कृपाळ, निबंधक खात्याचे प्रशिक्षक दिनेश नाईक, सल्लागार प्रमोद कृपाळ, संचालक महादेव सोहनी, अजित कुशे, रवींद्र म्हसकर यांनी मार्गदर्शन केले. संदीप गांधी व पल्लवी घाग यांनी विद्यार्थी पारितोषिक योजनेकरिता 10,000 रुपयांचे धनादेश सुपूर्द केले. संदेश नारकर, अशोक पारकर आणि प्रकाश वर्दम यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सोहळ्याला माधुरी रेवडेकर, सुनील सोहनी, अमीर हळदिवे यांचे सहकार्य लाभले.
Comments are closed.