लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026: अजित पवार यांच्या निधनानंतर नवनियुक्त अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी 2025-26 या वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन या चार स्तंभांवर यंदाचा अर्थसंकल्प आधारित आहे. यामध्ये 16 उपक्षेत्रांचा समावेश असल्याचे देवेंद्र फडणवीस (FM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. (Maharashtra Arthsankalap 2026)

आजचा अर्थसंकल्प मांडताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले अजित पवार आज आपल्यात नाहीत. अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला होता. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे कठीण काळातही राज्याच्या अर्थव्यवस्थेची घडी नीट राहिली होती. त्यांना श्रद्धांजली म्हणून सगळ्यांशी चर्चा करुनत्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो. तसेच आजचा अर्थसंकल्प मी अजित पवारांच्या स्मृतीला अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) पुढील आर्थिक वर्षातही सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावर विरोधकांनी लगेच महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींचे अनुदान 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याच्या दिलेल्या आश्वासनाबद्दल विचारले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की,  काळजी करु नका तुमच्या मनातील गोष्टी आम्हीच पूर्ण करणार. वेळ आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, फक्त कोर्टात जाऊ नका, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच राज्यात सध्याच्या घडीला 37 लाख लखपती दीदी आहेत. आणखी 25 लाख बहि‍णींना लखपती करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?

आणखी वाचा

Comments are closed.