मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मुंबई : कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण (ladki bahin yojana) योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तसेच, पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबध्द असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै 2024 ते डिसेंबर 2024) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असेही विभागाने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचे पैसे परत घेण्यासाठी राज्य सरकारने नवीन लेखा शीर्षक (हेड) उभारलेलं आहे. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचे पैसे परत घेण्यासाठी राज्य सरकारने नवीन लेखा शीर्षक (हेड) उभारलेलं आहे. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी खुलासा केला आहे. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि त्या आता अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, यापुढे त्यांना ही योजना लागू राहणार नाही, असेही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
राज्य शासनाच्या 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे. महिलांना आर्थिक रित्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 या वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला होता. मात्र, योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबविली होती. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्माननिधी परत घेण्यात येणार नसून, मात्र अपात्र ठरलेल्या महिलांना या योजेतून वगळण्यात येत आहे.
आत्तापर्यंत अपात्र ठरल्या 5 लाख महिला
शासनाच्या स्क्रुटीनीनुसार आत्तापर्यंत 5 लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत. त्यामध्ये 2 लाख 30 हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत. एक लाख 10 हजार महिला वय वर्षे 65 पेक्षा जास्त आहेत. तर, महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एकूण महिला एक लाख 60 हजार आहेत, अशा एकूण पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय…
– अदिती एस टाटकेरे (@iadititatkare) 7 फेब्रुवारी, 2025
हेही वाचा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
अधिक पाहा..
Comments are closed.