सुरेश धसांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का? लक्ष्मण हाकेंचा सवाल,म्हणाले,’पॉलिटिकल Score set
लक्ष्मण हाके: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. या हत्या प्रकरणात समोर भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या धक्कादायक खुलाशांनंतर आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी दबाव वाढतोय. मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या वाल्मीक करडांवर (Walmik Karad) मोक्का लावावा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी जोर धरू लागलेली असताना धनंजय मुंडे यांच्या बाजूने ओबीसी समर्थक लक्ष्मण हाके (Lakshman Hake) उतरले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भांडवल करू नये, या घटनेचे गांभीर्य धस यांच्या डायलॉगबाजी मुळे कमी होतंय. पॉलिटिकल स्कोर सेट करण्याचा सुरेश धस यांचा प्रयत्न आहे, असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी सुरेश धस यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का असा सवाल केलाय. (Lakshman Hake on Suresh Dhas)
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडमध्ये घडामोडींना वेग आला असून वाल्मीक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा, मोक्का लावावा यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उंच टाकीवर चढवून आंदोलन सुरू केलं आहे. मस्साजोग गावातील गावकरी ही आंदोलनात आक्रमक झाले आहेत. आंदोलन सुरू करता आज मराठा आंदोलन मनोज जरांगेही मसाजोगमध्ये दाखल झालेत. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी वाल्मीक कराडांची पाळमुळं खणून काढणाऱ्या सुरेश धसांवर जोरदार टीका केलीय .
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे .माझं कुठलंही भाषण कडा मी कधीही आरोपीचा समर्थन केलं नाही .मला आत्ताच जीवे मारण्याचा कॉल आला . एका अनोळखी नंबर वरून फोन आला .तू तुझ्या घरचे बघ . तुझ्या मागे कुत्रं नाही असं या धमकीत सांगितलं गेलं .संतोष देशमुख प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे . लोकप्रतिनिधीचे डायलॉग बाजी करतात त्यांना विनंती आहे .एका समाजाला टार्गेट करत आहेत . त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे ? असं लक्ष्मण हाके म्हणाले.
घटनेचे गांभीर्य धस यांच्या डायलॉगबाजीमुळे कमी होतंय: हाके
सुरेश धस यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का असा सवाल करत अजित पवारांवर सुद्धा त्यांचा विश्वास नाही .संतोष देशमुख यांच्या हत्येचे भांडवल करू नये . या घटनेचे गांभीर्य धस यांच्या डायलॉग बाजी मुळे कमी होतंय .पॉलिटिकल स्कोर सेट करण्याचा सुरेश धस यांचा प्रयत्न आहे . सुरेश धस अंजली दमानिया यांना बिंदू नियमावली बाबत कधीही माझ्यासमोर यावं .त्यांना एका कम्युनिटीला टार्गेट करायचा आहे का ? मी संविधानिक बाजूने बोलतोय असं हाके म्हणाले .
अधिक पाहा..
Comments are closed.