लालबागचा राजा फक्त श्रीमंतांचा गरिबांचा नव्हे, नरेटिव्ह सेट करणाऱ्या फोटोग्राफरवर पोलिसांकडून ग

लालबुगचा राजा दर्शन: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा प्रचंड टीकेचे धनी ठरले होते. लालबागचा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या सामान्य भाविकांना एक न्याय आणि श्रीमंत, व्हीआयपी, सेलिब्रिटींना वेगळी विशेष वागणूक दिली जाते, असा आरोप झाला होता. त्यामुळे लालबागचा राजा मंडळ (Lalbaugcha Raja 2025) आणि कार्यकर्त्यांची प्रचंड नाचक्की झाली होती. या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा मंडळ हे आक्रमक झाले होते.  त्यांनी एका कोळी बांधवाला न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांबाबत (Mumbai Police) गैरसमज निर्माण करणारे रिल (Reel) तयार केल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लालबागच्या विसर्जनाला विलंब झाल्यानंतर सोशल मिडियावर अनेकांनी रिल्सच्या माध्यमातून त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान लालबाग राजाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर रिल बनवल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालबाग राजाच्या विसर्जनादरम्यान पोलिस गर्दीतून राजाची वाट मोकळी करत असताना फोटोग्राफरने आपल्या रिलमध्ये चुकीचा मेसेज देत तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. या व्हिडिओत प्रामुख्यान लालबाग राजाचे दर्शन श्रीमंतांसाठी सोईस्कर आणि सर्व सामान्यांसाठी खडतर अशाप्रकारे दाखवण्यात आले होते. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी समाज माध्यमात खोटी व बदनामीकारक विधान केल्याने पोलिसांनी संबधितावर गुन्हा दाखल केला आहे. लालबागचा राजाच्या विसर्जनाला यंदा प्रचंड उशीर झाला होता. रविवारी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर दीड-दोन तासांमध्ये त्याचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, लालबागचा राजाचे विसर्जन होण्यासाठी रात्रीचे नऊ वाजले होते.

Lalbaugcha Raja 2025: लालबागचा राजा मंडळाकडून पहिली अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला न्यायालयात खेचणार

लालबागचा राजा मंडळ (Lalbaugcha Raja Visarjan 2025) गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर (Hiralal Wadkar) यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. समुद्राला मोठी भरती असल्याने लालबाग राजाचे विसर्जन रविवारी (7 सप्टेंबर) विलंबाने झाले. या सगळ्याबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून मंडळाची बदनामी केली. त्यामुळे वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय लालबाग राजा मंडळाने घेतला होता.

हिरालाल वाडकर यांनी 7 सप्टेंबरला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबाबत गंभीर आरोप केले होते. आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षापासून लालबाग राजाचे विसर्जन करत आहोत. यंदा मात्र मंडळाने गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिले आणि गणित चुकले. परिणामी लालबागचा राजाच्या विसर्जनाला इतका विलंब झाला, असा दावा हिरालाल वाडकर यांनी केला होता. मात्र, हिरालाल वाडकर यांचा हा दावा सपशेल खोटा आहे. केवळ प्रसिद्धी आणि बदनामीच्या हेतूने हिरालाल वाडकर व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचे लालबागचा राजा मंडळाकडून सांगण्यात आले.

https://www.youtube.com/watch?v=X7E3NBDU1RQ

आणखी वाचा

लालबागचा राजा मंडळाकडून पहिली अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला न्यायालयात खेचणार, नेमकं काय घडलं?

लालबागचा राजाचा तराफा गुजरातचा नव्हताच, मग कुठे तयार केलेला?; मंडळाने अखेर सगळं सांगितलं!

आणखी वाचा

Comments are closed.