वैभव सूर्यवंशी हा आगामी काळात एक मोठा सुपरस्टार ठरेल; दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूने व्यक्त केला विश्वास
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर हिंदुस्थानी क्रिकेटची घोडदौड कशी सुरू राहील, यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुझनर याने विश्वास व्यक्त केला आहे. सचिन तेंडुलकर यांचे विक्रम नवीन पिढीने कसे गाठले याचे उदाहरण देत खेळाडू येतात-जातात पण क्रिकेट पुढे जात राहते, असे त्याने स्पष्ट केले. तसेच, हिंदुस्थानच्या या भविष्यातील वाटचालीत किशोरवयीन युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हा आगामी काळात एक मोठा सुपरस्टार ठरेल, असा ठाम विश्वास त्याने व्यक्त केला.
वैभव सूर्यवंशीसह शुभमन गिलकडेही टीम इंडियाचे भविष्य म्हणून पाहिले जात असून, गिल आधीच अनेक फॉरमॅटमध्ये नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. फलंदाजी आणि कर्णधारपद या दोन्ही भूमिकांची जबाबदारी यशस्वीपणे वेगळी राखणारे महान कर्णधारच पुढे यशस्वी झाले, असे सांगत क्लुझनर याने शुभमन गिल हाच आगामी काळात हिंदुस्थानचं यशस्वी नेतृत्व करण्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. हिंदुस्थानी क्रिकेटला पुढे नेण्यासाठी अशाच युवा आणि तंदुरुस्त ताकदीची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Comments are closed.