हॉस्टेलच्या वादातून लातूरमध्ये हाणामारी, तरुणाचा भोसकून खून, तर दोन जण जखमी, चार जणांना अटक
लातूर क्राईम न्यूज : लातूर शहरातील औसा रोड परिसरात हॉस्टेलच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यामध्ये विक्रम पांचाळ (वय 21) या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून झाला होता .पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांमध्ये हा वाद ढाला होताय या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेत इतर दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मागील पंधरा दिवसांत लातूरमध्ये अशा दोन घटना घडल्याने पोलिसांनी सरप्राईज कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती लक्षात घेता परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अहिल्यानगरमध्ये पोटच्या मुलानेच आईला संपवलं
अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात पोटच्या मुलानेच आईचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बेबी गवारे असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती किरकोळ कारणावरुन सुहास गवारे उर्फ मामा याने आईशी वाद घालत तिला मारहाण केली होती. यामध्ये सुहास गवारेने आपल्या आईला भिंतीवर आपटलं आणि कात्रीने तिचा निर्घृण खून केला. विशेष म्हणजे आरोपी सुहास गवारे याने आईच्या मृतदेहाजवळच गोट्या खेळत
स्वतःलाच घरात कोंडून घेतलं होतं. यावरुन तो मनोरुग्ण असल्याचं प्राथमिक दृष्ट्या समजत आहे. माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाणेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. सध्या संशयित सुहास गवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.