जमीन विक्रीवरून वाद, आईचा खून, मुलाची आत्महत्या; लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
लॅटूर क्राइम न्यूज लॅटूर: लातूरमधील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून (Latur Crime News) करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सुमिंद्रबाई जाधव (वय 70) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय 48) मागील काही दिवसांपासून धरत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने रागाच्या भरात काकासाहेब यांनी ७ ऑगस्ट रोजी शेतातच आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकला.
एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत काकासाहेब जाधव यांचा मृतदेह-
सदर घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांचा तपास सुरू झाला. आई आणि मुलांमध्ये शेतजमीन विकण्यावरून वाद असल्याची माहिती मिळाली. मुलगा काका साहेबाचा शोध सुरू झाला. मात्र काकासाहेबांचा तपास लागला नाही. रेणापूर शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत काकासाहेब जाधव यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, रेणापूर पोलिस पुढील तपास करत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उदगीरात दोन तरुणाची जीवघेणी हाणामारी-
उदागीरात 6 ऑगस्ट रोजी दोन तरुणाची जीवघेणी हाणामारी झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला. दोन तरुण नशेत बेभान झाले होते. एकाच्या हातात वस्तारा होता, तर दुसऱ्याच्या हातात सत्तूर…दोघेही एकमेकांवर वार करत होते. दोघांनाही इजा झाली होती. अंगातून रक्त वाहत असताना सुद्धा दोघं एकमेकाला मारण्यात व्यस्त होते. हा सगळा प्रकार उदगीर शहरातील मुख्य चौक असलेल्या चौबारा या भागात झाला. काही जणांनी ही घटना मोबाईल कॅमेरात कैद केली. घटनेची माहिती उदगीर शहर पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत हे दोघेही निघून गेले होते. पोलिसांनी त्या दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सलमान शेख आणि अराफात शेख या दोन तरुणात हे भांडण झालं होतं. एकमेकांच्या जीवावर उठलेले हे दोघेही जखमी अवस्थेत होते. दोघांच्या विरोधात उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.