धक्कादायक! वडिलांना तिकीट नाकारलं, पुत्रानं थेट आमदार कार्यालयासमोरच मूत्रविसर्जन केलं

आळशी: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून लातूर जिल्ह्यात 59 जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने विविध प्रकारे नाराजी व्यक्त केली जात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार उदगीर येथे समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून आपल्या वडिलांना उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून एका तरुणाने थेट आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यालयासमोर मूत्रविसर्जन करून निषेध नोंदवला आहे.

आमदारांच्या कार्यालयासमोर जाऊन घोषणाबाजी करत मूत्रविसर्जन केले

मधुकर एकुर्गेकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमदार संजय बनसोडे यांच्याकडे उमेदवारीसाठी अर्ज केला होता. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या मुलगा नितीन एकुर्गेकर याने आमदारांच्या कार्यालयासमोर जाऊन घोषणाबाजी करत मूत्रविसर्जन केले. या घटनेचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केला होता, मात्र काही तासांनंतर तो डिलीट करण्यात आला.

सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य होत नाही, संजय बनसोडेचं स्पष्टीकरण

या प्रकारामुळे जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. आमदार संजय बनसोडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळं सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य होत नाही. संबंधित तरुणाची नाराजी समजू शकतो मात्र अशा प्रकारचे कृत्य चुकीचे असून काही क्षणाचा राग राजकारणात योग्य नाही असे मत संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा

Comments are closed.