सहकाऱ्यावरील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके ॲक्शन मोडमध्ये; पोलीस अधीक्षकांची घेतली भेट, प्रशासनाला द
बीड: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचा सहकारी पवन कंवर याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि याच प्रकरणी लक्ष्मण हाके यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षक (Beed SP) नवनीत कॉवत यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पवन कंवर हे लक्ष्मण हाके यांच्या प्रत्येक आंदोलन आणि सभेदरम्यान सोबत होते. मात्र मध्यरात्री त्यांच्यावर माजलगावच्या ग्रामीण भागात जीवघेणा काल (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास हल्ला झाला. याच प्रकरणात आता लक्ष्मण हाके आक्रमक झाले असून दोन दिवसात आरोपींना अटक न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. लक्ष्मण हाके पोलीस अधीक्षक कार्यालयात येणार असल्याचे समजताच अधीक्षक कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.(Laxman Hake met with Superintendent of Police of beed)
Beed Crime News: हॉटेलमध्ये पवन कंवर जेवण्यासाठी गेले असता हल्ला झाला
ओबीसी कार्यकर्ता पवन कंवर याच्यावर हल्ला करणारे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासोबत आरोपींचे फोटो देखील आहेत. तसेच याच कार्यकर्त्याने फेसबुकवर पोस्ट केली होती, यामध्ये त्याने विजयसिंह पंडित यांना उद्देशून मला काम देऊ नका परंतु हाके याला ठोकायची परवानगी द्या असे म्हटले होते. त्याच कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये पवन कंवर हे जेवण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी 30 ते 40 जणांनी मिळून हल्ला केला. यामध्ये पवन कंवर यांचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच डोक्यात देखील रोडचा घाव घालण्यात आल्याची माहिती प्राध्यापक हाके यांनी दिली असून आता पोलिस अधीक्षकांची भेट घेत या आरोपींना अटकेची मागणी केली आहे. संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन बीडच्या पोलीस अधीक्षकांनी दिल्याचे देखील हाके यांनी यावेळी सांगितले आहे.
Beed Crime News: अज्ञात 40 ते 50 युवकांनी येऊन काठ्या व लाथाबुक्क्यांनी या चौघांना मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे केरवाडी पालम येथील रहिवासी पवन कंवर व त्यांचे तीन साथीदार काल (मंगळवारी, ता 23) संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सावरगावजवळ एका धाब्यावर जेवण करत होते. याच वेळी अज्ञात 40 ते 50 युवकांनी येऊन काठ्या व लाथाबुक्क्यांनी या चौघांना मारहाण केली. या घटनेत पवन कंवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे, तर त्यांच्या साथीदारांनाही मार लागला आहे. याबाबतची माहिती ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालक कोळी यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी या चौघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.