बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, हाकेंची भूमिका, सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोण?
लक्ष्मण हाके : बारामती विधानसभा पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही ही आमची भूमिका आम्ही जाहीर केल्याचे मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल? मी स्वतः की अन्य हे येत्या दोन दिवसात तुम्हाला कळवण्यात येईल असेही ते म्हणाले. ओबीसी नेते असो, की महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पडणारे पवार कुटुंबीय असो ओबीसीच्या आरक्षणावर काही बोलत नाहीत. ओबीसींचा आरक्षण संपलंय असंच म्हणावं लागेल असे हाके म्हणाले. शरद पवार यांनी निवडणुकांमध्ये मूळ ओबीसींना तिकीट देऊ अशी भूमिका जाहीर केली होती. परंतू, जेव्हा निवडणुका आल्या त्यावेळेस त्यांनी केलेल्या घोषणेनुसार काहीही पाळले नाही अशी टीका हाके यांनी केली.
निवडणुका बिनविरोध होत असतील तर ते लोकशाहीसाठी घातक
ओबीसींचे प्रश्न मांडण्यासाठी समाजातील तमाम राजकीय सामाजिक विचारवंतांचे लक्ष वेधण्यासाठी ही निवडणूक लढवीत आहोत असे हाके म्हणाले. सहानुभूतीच्या मुद्द्यावर जर निवडणुका बिनविरोध होत असतील तर ते लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करु असे हाके म्हणाले. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली म्हणून सर्व पक्ष ही निवडणूक बिनविरोध करत असताना आम्ही यात कुठलाही खोडा घालत नाही. राजकारणामध्ये अचूक टायमिंग साधणारे पवार कुटुंबीय जर तिसऱ्या दिवशी शपथ घेत असेल स्वतःच्या मुलीच्या लग्नाची तारीख घोषित करत असतील, आजोबा आणि नातू राज्यसभेवर जात असतील तर आम्ही निवडणूक का लढवू नये? असा सवाल हाकेंनी केला. दुःख काय सामान्य माणसांनीच करायचं का?
भाजपनेही बारामतीत उमेदवार उभा करावा
भाजपनेही बारामतीत उमेदवार उभा करावा असे हाके म्हणाले. तुम्ही सहानुभूतीच्या आडून दुखाच्या आडून कशाला निवडणुकीला सामोरे जात आहात. ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत अजितदादा असंवेदनशील होते. ते आता स्वर्गवासी झाले आहेत. काय योगदान आहे तुम्ही सांगा मला असे हाके म्हणाले. सारथी पार्टी आणि अन्य आर्थिक विकास महामंडळांना तुम्ही भरघोस निधी देत आहात, परंतु महाज्योतीला दूजाभाव केला जात आहे. अजित पवारांच्या हयातीत आर्थिक विकास महामंडळ यांना अध्यक्षपद दिले नाही कार्यालय दिले नाही. एका घरात पाच पाच सहा संविधानिक पद, मग आम्ही टीका कुणावर करायची? असा सवाल हाकेंनी केला.
अशोक खरातबद्दल मनोज जरांगे का बोलत नाही?
अशोक खरातबद्दल मनोज जरांगे का बोलत नाही? असा सवाल देखील हाकेंनी केला. जरांगे पाटील आता भोंदू बाबा खरात बद्दल का बोलत नाही हे त्यांना विचारणं आवश्यक आहे. उठसूट प्रत्येक गोष्टीमध्ये भूमिका घेणारे आता या प्रकरणात गप्प का? हे शोधणे आवश्यक आहे. असे लक्ष्मण हाके म्हणाले. महाराष्ट्रात एखाद्या बलात्कारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाची कुणीही व्यक्ती जात शोधत नाही. कुठलीही जात गुन्हेगाराचं अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन करत नाही. मात्र, यापूर्वी गुन्हेगार समोर आल्यानंतर त्याची जात शोधून टीका करणारे नेते आता का बोलत नाहीत असे हाके म्हणाले. जरांगे पाटील आता भोंदू बाबा खरातबद्दल का बोलत नाही? हे त्यांना विचारणं आवश्यक आहे. खरात याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. खरात बरोबर ज्यांचे फोटो आहेत, त्या सगळ्यांवर कारवाई करावी आख्ख मंत्रिमंडळ खाली होईल असे हाके म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.