लिफ्ट मागणाऱ्यास कारसह जाळलं; हातातील कडं गाडीत टाकलं; अपघाताची स्क्रिप्ट लिहून तो घराबाहेर पडल

लातूर: लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा बळी घेतल्याची संतापजनक घटना लातूरमध्ये (Latur) उघडकीस आली आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत छडा लावला आणि सत्य उघडकीस आणलं. डोक्यावर असलेल्या कर्जातून (latur Crime News)सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. विशेष म्हणजे, या बनावासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाचा खून करण्यात आल्याची खळबजनक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडली. याप्रकरणी, आरोपीविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latur Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीच्या डोक्यावरती ५७ लाखांच्या फ्लॅटच्या हप्त्यातून कर्जबाजारीपणा आला होता, त्यामुळे त्याने एक कोटीच्या विम्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला. या कथित कार अपघातात लिफ्ट मागणाऱ्यास आपणच जाळून मारल्याची कबुलीही त्याने पोलिसांना चौकशीवेली दिली. गणेश चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत कोकणातील विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, वानवडा पाटी ते वानवडा (ता. औसा) मार्गावर एका कारला शनिवारी पहाटे आग लागली असल्याचा फोन आला. रात्री गस्तीवरील औसा ठाण्याचे अधिकारी, अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. त्यांनी आग आटोक्यात आणली. कारमध्ये एक मानवी हाडाचा सांगाडा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. यावरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली. जळालेल्या मृतदेहाचे जागेवर शवविच्छेदन केले.

Latur Crime News: हातातील कडे, कारवरून तोच असल्याचा केला दावा

जळालेल्या कारमधून प्राप्त झालेल्या हातातील कडे आणि कारचा क्रमांक यावरून हा सांगाडा गणेश चव्हाण याचाच असल्याचा नातेवाइकांनी दावा केला. पोलिसांनी मृतदेह दफन करण्याच्या अटीवर नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

Latur Crime News: अपघाताची स्क्रिप्ट लिहून तो घराबाहेर पडला…

घटनास्थळावर जळालेल्या कारचा क्रमांक १ (एम.एच. ४३ ए.बी. ४२००) असून, पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध घेतला. ही कार बळीराम गंगाधर राठोड (रा. औसा तांडा) यांची असल्याचं तपासणीमध्ये समोर आलं. हे वाहन मेहुणा गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गणेश चव्हाणचा शोध घेतला असता, तो १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता मित्राला लॅपटॉप देण्यासाठी बाहेर पडला. तो घरी परतला नसल्याची माहिती पत्नीने दिली. घटनास्थळावरील पुरावे, मोबाइल चॅटिंग आधारे आरोपीचा शोध घेतला. एक सुगावा पोलिसांच्या हाती लागला त्यानंतर बनावट मृत्यूचा आणि गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. गणेश चव्हाण याने हा बनाव केल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यांनी विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) गाठले. त्यास अटक केल्यानंतर खाक्या दाखवला. एक कोटीच्या विम्यासाठी, कर्जबाजारीपणातून आपणच दुसऱ्याला जाळल्याची कबुली त्याने दिली.

आणखी वाचा

Comments are closed.