वडिलांच्या निधनानंतर लिओनेल मेस्सीने घेतला मोठा निर्णय, फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक

जगातील सर्वाेत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीवर काही दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपूर्वी मेस्सीच्या वडिलांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. मेस्सीच्या जडणघडणीत त्याच्या वडिलांची भूमिका निर्णायक होती. लिओनेल मेस्सीचं व त्याच्या वडिलांचं नात खूप घट्ट होतं. मेस्सीच्या कारकीर्दीत महत्त्वाचा वाटा असणारे त्याचे वडील त्याच्या अनेक सामन्यांना हजर होते. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर मेस्सीने मोठा निर्णय घेतला आहे.

वडिलांच्या निधनामुळे व्यथित झालेल्या लिओनेल मेस्सीने अनिश्चित काळासाठी फुटबॉलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 68 वर्षीय जॉर्ज मेस्सी यांचे दीर्घ आजारानंतर रोसारियो येथील एका क्लिनिकमध्ये निधन झालं असून, हा धक्का मेस्सीसाठी अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक असल्याचं मानलं जात आहे. वडील गेल्यानंतर आप्तस्वकीयांबरोबर असण्याच्या दृष्टीने मेस्सीने सर्व प्रकाराच्या फुटबॉलमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंच वेबसाईट फूट मर्केटोने यासंदर्भात वृत्त दिल्याचं गोल डॉट कॉमने म्हटलं आहे.

फ्रेंच संकेतस्थळ फूट मर्केटोने, गोल डॉट कॉमचा हवाला देत, अर्जेंटिनातील माध्यमांच्या वृत्तांचा उल्लेख केला आहे. त्यानुसार, आठ वेळचा बॅलन डी’ऑर विजेता मेस्सीने या कठीण काळात कुटुंबासोबत राहण्यासाठी व्यावसायिक फुटबॉलमधील सर्व जबाबदाऱ्यांपासून तात्पुरता दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मेस्सीने अद्याप इंटर मियामीसाठी पुनरागमनाची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. त्यामुळे सध्या त्याच्यासाठी फुटबॉलपेक्षा कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींना वेळ देणं अधिक महत्त्वाचं असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मेस्सीने पुनरागमन कधी करणार यासंदर्भात काहीही भाष्य केलेलं नाही.

जॉर्ज मेस्सी यांनी लिओनेलच्या संपूर्ण कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुरुवातीच्या काळापासून ते एजंट आणि सल्लागार म्हणून त्याच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात सहभागी होते. त्यामुळे त्यांचं निधन मेस्सीसाठी मोठा मानसिक धक्का मानला जात आहे. जॉर्ज मेस्सी हे लिओनेलच्या सुरुवातीच्या फुटबॉल प्रवासातही सक्रियपणे सहभागी होते. मेस्सी 13 वर्षांचा असताना त्याला स्पेनमध्ये बार्सिलोनाच्या युवा अकादमीत दाखल होण्यासाठी त्यांनी महत्त्वाची मदत केली.

कॅटलन क्लबने मेस्सीच्या ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी या आजारावरील उपचारांचाही खर्च उचलला. या आजारामुळे त्याच्या शारीरिक वाढीवर परिणाम झाला होता. उपचारादरम्यान मेस्सीला दररोज इंजेक्शन घ्यावे लागत होते आणि त्यानंतर त्याची अंतिम उंची 1.70 मीटर वाढली. जॉर्ज मेस्सी यांचे लग्न सेलिया कुच्चित्तिनी यांच्याशी झाले होते आणि त्यांना चार मुले आहेत, लिओनेल, रोड्रिगो, माटियास आणि मारिया सोल.

Comments are closed.