ऍथलेटिक बॉडीसाठी भारतीय क्रिकेटपटू वापरत आहेत ड्रग्ज? खळबळजनक दावा

भारतीय खेळाडूंची फिटनेस सध्या जागतिक स्तरावर उच्च दर्जाची मानली जाते आणि त्याचीही चर्चाही नेहमीच होत असते. विराट कोहलीप्रमाणे असे अनेक भारतीय खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे फिटनेसबरोबर उत्तम शरीरयष्टीही (ऍथलेटिक बॉडी) आहे, मात्र आता एक धक्कादायक दावा समोर आला आहे. एका रिपोर्टनुसार, अनेक भारतीय क्रिकेटपटू उत्तम बॉडीसाठी आणि सडपातळ दिसण्यासाठी एका विशेष औषधाचा (ड्रग्ज) वापर करत आहेत. यामुळे खेळाडूंचे वजन लवकर कमी होते आणि त्यांची ताकद कायम राहते. या खेळाडूंमध्ये आयपीएल आणि भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश असल्याचे कळते.
क्रिकब्लॉगरच्या रिपोर्ट्सनुसार, आयपीएल (IPL) खेळाडूंसह अनेक भारतीय क्रिकेटपटू अधिक सुडौल शरीरयष्टी मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जाणाऱ्या वजन कमी करण्याच्या इंजेक्शनचा वापर करत आहेत.
त्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, आयपीएल (IPL) खेळाडूंसह अनेक क्रिकेटपटू सडपातळ दिसण्यासाठी ‘ओझेम्पिक’ (Ozempic) आणि ‘माउंजारो’ (Mounjaro) यांसारखी GLP-1 औषधे घेत आहेत. यांच्या वापरामुळे भूक कमी लागते आणि अशक्तपणा येत नाही, त्याचबरोबर फॅटही कमी होतात.
खेळाडू हे ड्रग्ज डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतात आणि त्याचा खर्चही अधिक आहे. हे नियमित व्यायामासोबत घेतले तर वजन अधिक वेगाने कमी होण्यात मदत होते, मात्र याचे काही दुष्परिणामही आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेळीच याकडे लक्ष दिले तर अधिक चांगले होईल.
या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, हा कल आता युवा खेळाडूंपर्यंत पोहोचत असून, काही खेळाडू वैद्यकीय गरज नसतानाही या औषधांचा वापर करून पाहत आहेत.
भारतामधील उपचार आणि खर्च
मागील काही महिन्यांमध्ये GLP-1 उपचारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. माउंजारो’ (Mounjaro) हे भारतात सर्वप्रथम 2025 मध्ये आले. त्याच्या किंमत 2.5 मिलीग्रॅमसाठी दरमहा अंदाजे 13.125 रूपये आणि 15 मिग्रॅ डोससाठी दरमहा अंदाजे 25,781 रूपये आहेत.
GLP-1 कसे काम करते?
“जीएलपी-1 (GLP-1) हे लहान आतडे आणि मोठ्या आतड्यात तयार होणारे एक नैसर्गिक आतड्याचे संप्रेरक आहे. ते जेवणानंतर स्रवते आणि स्वादुपिंडाला इन्सुलिन स्रवण्यासाठी संकेत देते, पोटातील पचनक्रिया मंदावते आणि पोट भरल्याची भावना निर्माण होते,” असे त्या सूत्राने सांगितले आहे. (several Indian cricketers, including some IPL players, are using weight-loss injections to achieve a slimmer physique.)
Comments are closed.