मोठी बातमी! दिल्ली कॅपिटल्सच्या अभिषेक पोरेलला अटक, विद्यार्थीनीने केलेल्या लैं*गिक शोषणाच्या आरोपानंतर कारवाई

आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा आणि बंगालाचा युवा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अहवालानुसार, एका तरुणीने केलेल्या छळ आणि शोषणाच्या आरोपांमुळे डीसीच्या विकेटकीपर-फलंदाज अभिषेकला पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार तरुणीने आरोप केला आहे की, पोरेलने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी संबंध ठेवले आणि नंतर त्यांचे खाजगी फोटो प्रसारित करण्याची धमकी दिली. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये (FIR) कायद्याच्या 19 कलमांचा समावेश असल्याचे समजते; त्यापैकी अनेक कलमे अजामीनपात्र गुन्ह्यांशी संबंधित आहेत.
हुगळी जिल्ह्यातील मगरा पोलीस ठाण्याला कारवाई करण्याचे आणि पोरेलचा मोबाईल फोनसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ही अटक करण्यात आली. मंगळवारच्या सुनावणीदरम्यान, पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली की पोरेलला ताब्यात घेण्यात आले आहे.
एफआयआरमध्ये काही गंभीर आरोपही आहेत; त्यानुसार, पोरेलने तक्रारदार तरुणीला डांबून ठेवले, तिला अन्न दिले नाही आणि एकाकी ठेवले, ज्यामुळे ती शारीरिकदृष्ट्या अशक्त झाली आणि तिला नीट चालणेही कठीण झाले.
Comments are closed.