हिटमॅन टीव्हीवर घालणार धुमाकूळ! क्रिकेट नाही तर खास ‘द रोहित शर्मा शो’द्वारे, वाचा सविस्तर

भारताचा अनुभवी क्रिकेटपटू रोहित शर्मा आता त्याची नवी इनिंग सुरू करत आहे. तो लवकरच टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. कसोटी आणि टी20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतासाठी केवळ वनडे सामने खेळणारा रोहित आता मनोरंजन विश्वात प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे. त्याचा स्वत:चा द रोहित शर्मा शो नावाचा कार्यक्रम असणार आहे.

द रोहित शर्मा शो चा टीझर सोनी टीव्ही नेटवर्कने प्रदर्शित करून एकच खळबळ उडवून दिली. त्याआधी म्हणजे यावर्षीच्या मे महिन्यात एक प्नोमो व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये रोहितच्या चाहत्यांनी त्याला गर्ल इन द गार्डन ही ओळ म्हणण्याचा आग्रह केला होता. तेव्हा रोहित म्हणाला, मी केवळ दोन ओळी बोललो म्हणून तो व्हायरल झाला, जेव्हा पूर्ण शो येईल तेव्हा काय परिस्थिती असेल?

तसेच आता आलेल्या व्हिडिओमध्ये रोहित कॅमेरामन आणि क्रू मेंबर्सना सल्ला देताना दिसत आहे.अद्याप द रोहित शर्मा शो ची अधिक माहिती पुढे आलेली नाही, मात्र रोहित यामध्ये ऍंकरिंग करताना दिसू शकतो.
सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे सीईओ गौरव बॅनर्जी यांनी रोहितच्या भुमिकेचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, रोहित स्वत:च या शोचे सूत्रसंचालन करेल. हा शो विनोदी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहितची क्रिकेट कारकिर्द
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 मध्ये टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर त्याने टी20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली. त्याने मे 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे तो भारताकडून आता केवळ वनडे क्रिकेट खेळतो. नुकतेच त्याने खेळलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली होती.

लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या त्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहितने 138 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. त्यामुळे तो लॉर्ड्सवर वनडे शतक झळकावणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.

आतापर्यंत रोहितने 67 कसोटी सामन्यांमध्ये 12 शतके आणि 18 अर्धशतकांच्या सहाय्याने 4301 धावा केल्या. 159 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 5 शतके आणि 32 अर्धशतकांच्या सहाय्याने 4231 धावा केल्या. तसेच त्याने 288 वनडे सामन्यांमध्ये 34 शतके आणि 62 अर्धशतकांसह 11895 धावा केल्या आहेत.

आता भारताला उर्वरित 2026 मध्ये जवळपास 11 वनडे सामने खेळायचे आहेत. जर रोहित पूर्णपणे फिट असला तर तो या सर्व सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. यावर्षी भारत वेस्ट इंडिजविरुद्ध 3, श्रीलंकेविरुद्ध 3 आणि न्यूझीलंडविरुद्ध 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. (Rohit Sharma is set to make his Television & Entertainment debut with a new show on Sony Network)

Comments are closed.