ट्रेंड – छोटी गोंडस राष्ट्रभक्त
राष्ट्रगीत सुरू असताना एक चिमुकली अक्षरशः तल्लीन झाली आहे. हा व्हिडीओ @themojostory या इंस्टा अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. गणवेशातली ही लहानगी तिच्या निरागसपणामुळे सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतेय. तिचे डोळे बंद करून राष्ट्रगीत गाणे बघून तुम्हीसुद्धा तिचे कौतुक कराल. चिमुकलीने अतिशय आत्मविश्वासाने राष्ट्रगीत सादर केल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तिचा आवाज, स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीत म्हणणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हा व्हिडीओ चार लाख सहा हजारांपेक्षा जास्त जाणांनी पाहिला आहे. मुलीला नेटकऱयांनी किती गोड, कुणाची नजर नको लागायला, अशा कमेंट्स केल्या आहेत.
Comments are closed.