चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
मुंबई: आजकाल तुम्हाला कर्ज घेण्यासाठी बँकेच्या दारात किंवा क्रेडिट सोसायटीच्या दारात जावं लागत नाही. कर्ज वाटप करण्याचं टार्गेट असल्यानं काही संस्थांचे प्रतिनिधी तुमच्याशी फोनवरुन संपर्क साधतात तर थेट भेट घेतात. अलीकडच्या काळात डिजीटलायझेशन वाढल्यामुळं फोनवर सहजपणे कर्ज उपलब्ध होत आहे. त्यामुळं अनेकदा अनावश्यक कारणासाठी देखील कर्ज घेतली जात आहेत. कर्ज घेताना चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यामधील फरक कर्जदारांना माहिती नसतो.
चांगले कर्ज: चांगलं कर्ज म्हणजे काय?
द स्वातंत्र्य पासून बॅड कर्ज या पुस्तकात चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यासंदर्भातील फरक समजावून सांगितला आहे. जे कर्ज तुमच्या खात्यात किंवा खिशात पैसे टाकतं किंवा तुम्हाला श्रीमंत बनवतं त्याला चांगलं कर्ज म्हणतात. चांगलं कर्ज तुम्ही काढता मात्र, त्या कर्जाची परतफेड तुमच्यासाठी दुसरं कोणीतरी करत असतो. हे चांगल्या कर्जाचं वैशिष्ट्य आहे. उदा. एखादं घर किंवा मालमत्ता खरेदी करण्यास तुम्ही कर्ज काढलं आणि ती तुम्ही भाडेतत्त्वावर दुसऱ्यास दिसल्यास भाडेकरुनकडून जे भाडं मिळतं त्यातून तुम्ही कर्जाचा हप्ता भरु शकता.
खराब कर्ज: वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं?
वाईट कर्ज म्हणजे असं कर्ज ज्याची परतफेड तुम्हाला करावी लागते. ज्या कर्जाची परतफेड तुम्हाला स्वत: च्या कमाईतून करावी लागते. कर्ज कोणतंही असो चांगलं किंवा वाईट तुमचं त्यावर नियंत्रण असलं पाहिजे. तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्यावर किती रकमेचं वाईट कर्ज आहे याचा शोध घेतला पाहिजे. यानंतर तुमच्या दरमहा उत्पन्नाचा ताळेबंद तयार करा. यामध्ये तुमचं मासिक उत्पन्न आणि खर्च नोंदवा. खर्चाच्या रकान्यात घर खर्च, सर्व कर्जांच्या मासिक हप्त्याची रक्कम नोंदवा. आर्थिक शिस्त पाळा.
जेव्हा तुम्हाला मासिक उत्पन्न मिळतं किंवा पगार मिळतो त्यावेळी स्वत: साठी खर्च करा. त्यानंतर काही रक्कम बचत खात्यात ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. वाईट कर्जातून बाहेर पडण्यासाठी प्रथम स्वत: ला सत्य सांगा. तुमच्यावर किती कर्ज आहे आणि कोणाकडून घेतलंय हे माहिती असूद्यात, त्याची यादी करा. कर्ज फार वेळ थकलेले ठेवू नका. तुमच्यावर असलेल्या सर्व कर्जांची यादी करा. त्यामध्ये क्रेडिट कार्डशैक्षणिक कर्ज, कार कर्जवैयक्तिक कर्ज, मित्रांकडून घेतलेल्या कर्जांचा देखील उल्लेख करा. महिनाभरात होणाऱ्या तुमच्या प्रत्येक खर्चाची नोंद करा, यामुळं तुमच्या आर्थिक स्थितीचं सत्य चित्र तुमच्यापुढं उभं राहील.
तुमच्यावर असणाऱ्या सर्व कर्जांची यादी करा. ज्या कर्जाची कमी परतफेड शिल्लक राहिली आहे. ते संपल्यानंतर जी रक्कम मासिक हप्ता म्हणून भरत होता ती दुसरं कर्ज भरण्यासाठी वापरा. कर्जाचे हप्ते भरण्यासोबत गुंतवणूक देखील प्रारंभ ठेवा. दरमहा तुमच्या नियमित उत्पन्नाशिवाय पैसे मिळवण्यासाठी वेगळे मार्ग निवडा. त्यातून काही रक्कम उभी राहील त्याचा देखील फायदा होईल. वाईट कर्जाच्या जाळ्यातून मुक्त झाल्यानंतर त्या रकमेची गुंतवणूक प्रारंभ करा.
आणखी वाचा
Comments are closed.