LPG सिलेंडर, कारच्या किमती आणि पेन्शन, 1 जानेवारीपासून होणार 6 मोठे बदल
मुंबई : जुने वर्ष संपण्यासाठी आणि आता नवीन वर्ष सुरू व्हायला आता काहीच तासांचा अवधी राहिला आहे. नवीन वर्ष आपल्या आयुष्यात नव्या आशा घेऊन येतात. त्याचप्रमाणे आपल्यासाठी काही नवीन नियमही लागू केले जातात. यंदाच्या नवीन वर्षात असेच काही नियम लागू करण्यात येणार असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा थेट परिणाम होणार आहे.त्यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती, पेन्शनचे नियम, कारच्या किमती Amazon प्राईम मेंबरशिप, UPI 123pay नियम आणि FD संबंधित नियमांचा समावेश आहे.
1. कारच्या किमतीत वाढ
नवीन वर्षात कार खरेदी करणे महाग होणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, होंडा, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि BMW सारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवतील. कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागू शकतो.
2. एलपीजी सिलेंडरच्या किमती
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (14.2 किलो) किमतीत बदल झालेला नाही. पण व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 73.58 डॉलर्सवर आहे. त्यामुळे भविष्यात सिलेंडरच्या किमती बदलू शकतात.
3. पेन्शन काढण्यात बदल
नवीन वर्ष पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारे आहे. 1 जानेवारी 2025 पासून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पेन्शन काढण्याचे नियम सोपे केले आहेत. आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे. यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही. ही सुविधा पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा आहे.
4. Amazon Prime सदस्यत्वाचे नवीन नियम
Amazon प्राईम सदस्यत्वाच्या नियमांमध्ये बदल जाहीर करण्यात आले आहेत, जे 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. नवीन नियमांनुसार, प्राईम व्हिडीओ एका प्राईम खात्यातून फक्त दोन टीव्हीवर स्ट्रीम केला जाऊ शकतो. जर एखाद्याला तिसऱ्या टीव्हीवर प्राईम व्हिडीओ पाहायचा असेल तर त्याला अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. पूर्वी, प्राईम सदस्य एकाच खात्यातून पाच उपकरणांवरून व्हिडीओ प्रवाहित करू शकत होते.
5. मुदत ठेवीचे नियम (FD)
RBI ने NBFC आणि HFC साठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलले आहेत. नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. या बदलांतर्गत ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकांकडून ठेवी घेणे, तरल मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवींचा विमा करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे.
6. UPI 123p ची नवीन व्यवहार मर्यादा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या UPI 123Pay सेवेमध्ये व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, या सेवेअंतर्गत कमाल 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते. परंतु आता ही मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.