LPG दरवाढ : घरगुती सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; गॅस 'इतक्या' रुपयांनी महागला

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत आहे. महागाईने आता पुन्हा सर्वसामान्यांना फटका बसला आहे. घरगुती स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) एका सिलिंडरच्या किमतीत ५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर आज, ७ जूनपासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९१३ वरून ९४२ रुपये होईल.

गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी सिलेंडरमागे 60 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दरात वाढ करण्यात आली आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मार्चमध्ये 60 रुपयांची दरवाढ होऊनही तेल विपणन कंपन्या देशांतर्गत एलपीजी विक्रीत तोटा करत होत्या. या दरवाढीपूर्वी सरकारी तेल कंपन्यांना प्रति घरगुती एलपीजी सिलिंडर अंदाजे 703 रुपयांचा तोटा होत होता. त्यामुळे वाढता खर्च लक्षात घेऊन ही दरवाढ आवश्यक होती. त्यानुसार ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

LPG टंचाईच्या काळात सिलिंडरबाबत हे 7 सरकारी नियम जाणून घ्या, तुमचे कनेक्शन कधीही कट होणार नाही

दरम्यान, मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर मिळून 7.50 रुपये प्रतिलिटरने वाढले, तर CNG 6 रुपयांनी महाग झाले. कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर 11 रुपये आणि डिझेलवर 33.6 रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज आहे.

व्यावसायिक सिलिंडरचे दर आधीच वाढले आहेत

यापूर्वी 1 जून रोजी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 42 रुपयांनी वाढवण्यात आली होती, तर कोलकात्यात 53.50 रुपयांनी वाढ झाली होती. याव्यतिरिक्त, 5-किलो फ्री ट्रेड LPG (FTL) सिलिंडरच्या किंमतीत ₹ 11 ने वाढ करण्यात आली आहे. सिलिंडर आता दिल्लीमध्ये ₹ 821.50 मध्ये उपलब्ध होईल.

एसएमएसद्वारे सूचना

जागतिक स्तरावर सुरू असलेली उलथापालथ पाहता त्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर झाल्याचे दिसून येत आहे. इंधन आणि गॅसचा तुटवडा लक्षात घेता, एलपीजीच्या वापरावर मर्यादा घालण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात, अनेक गॅस ग्राहकांना त्यांच्या सेवा प्रदात्यांकडून एसएमएस सूचना प्राप्त झाल्या आहेत.

Comments are closed.