परळीतील राड्याप्रकरणी 82 दिवसांनी गुन्हा दाखल; मारहाण झालेल्या माधव जाधवांचा गंभीर आरोप, म्हणाल

माधव जाधव: विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते माधव जाधव (Madhav Jadhav) यांना मारहाण करण्यात आली होती. अखेर याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याच्या विरोधात रळी शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यानंतर माधव जाधव यांनी गंभीर आरोप केलाय.

परळी विधानसभा मतदारसंघातील बँक कॉलनी परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत माधव जाधव हे मतदान केंद्रावर गेले असता राजेसाहेब देशमुख यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस गार्ड समोरच माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली होती. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याचे परिणाम केवळ परळीच नाही तर बीड जिल्ह्यातील सगळ्या मतदाना प्रक्रियेवर झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र या संदर्भात परळी पोलिसांनी साधा गुन्हा सुद्धा नोंदवून घेतला नव्हता. आता 82 दिवसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

…म्हणून गुन्हा दाखल झाला नाही

मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे पोलिसांनी कैलास फड आणि त्याच्या मुलावर गुन्हा दाखल केला नव्हता, असा आरोप माधव जाधव यांनी केलाय.  विशेष म्हणजे माधव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांना कळवून सुद्धा गुन्हा दाखल होण्यासाठी 82 दिवस लागले आहे. माधव जाधव यांनी म्हटले आहे की, विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी मला मारहाण झाली. परळीतील हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. तरी सुद्धा तब्बल 82 दिवस गुन्हा दाखल झाला नाही. मला मारहाण करणाऱ्या कैलास फड आणि त्याच्या मुलावर आका आणि आकाच्या आकामुळे मारहाणीचा गुन्हा दाखल झाला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

अंजली दमानियांची मागणी

दरम्यान, कैलास फडवर गुन्हा दाखल होताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळीतील निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, अखेर 82 दिवसानंतर गुन्हा दाखल! कैलास फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल, विधानसभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाला हे आता स्पष्ट झाले आहे. इलेक्शन कमिशन कडे असे 20 ते 25 तक्रारीचे व्हिडिओ आहेत. त्यातील प्रत्येक व्हिडिओवर कारवाई करा. परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. किती मतदान झाले ते कळेल. एसपी नवनीत कावत यांचे आभार, असे त्यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=bdpecvrregs

आणखी वाचा

Beed News : अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं, परळीतील बोगस विकासकामांबाबत कारवाईला वेग

अधिक पाहा..

Comments are closed.