वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन रुपाली चाकणकरांना घेरलं, राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला, माधुरी मिसा
पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे .राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे . महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपार्या दिल्या जात आहेत अशी पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी टाकल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनामाची मागणी केली जात आहे . दरम्यान राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय अंतर्गत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे . आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी महिला आयोग आणि रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे .
काय म्हणाल्या माधुरी मिसाळ ?
महिला आयोगाचे काय कसे सुरू यापेक्षा हगवणे कुटुंबाला न्याय देणे महत्त्वाचे आहे . चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय अंतर्गत आहे .असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या . राज्य महिला आयोगाचे काम कसे सुरू आहे यापेक्षा आज हगवणे कुटुंबाला न्याय देणे महत्त्वाचे आहे आणि राज्याचे गृह विभाग त्यांना न्याय मिळवून देईल असा विश्वास आम्हाला आहे . तसेच रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय ही त्यांची अंतर्गत बाब असल्याची प्रतिक्रिया नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परभणीत दिली. मिसाळ यांनी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या विकास कामाची आढावा बैठक घेतली यानंतर त्यांनी महिला आयोग आणि चाकणकर यांच्या राजीनाम्या बाबत प्रतिक्रिया दिलीय..
रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली . गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यात शाब्दिक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत . राज्याला पार्ट टाइम नव्हे तर फुल टाईम महिला आयोग अध्यक्ष हव्या आहेत .सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत त्यामुळे दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांचा प्रकरणात वेळ मिळत नसावा .पण पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये .त्यामुळे राज्याला पार्ट टाइम नव्हे तर फुल टाईम महिला आयोग अध्यक्ष हव्या अशी जनतेची भावना आहे .त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र व्यक्तीने व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे .याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर हा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलंय.
अधिक पाहा..
Comments are closed.